• आ. राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
कोल्हापूर :
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले विचार, सर्वसामान्यांच्या सेवेसाठी झटण्याची शिकवण आणि लोकसेवेचा वसा अखंडितपणे पुढे सुरू ठेवणार असल्याचा निर्धार आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शिवसेनेच्या विविध विभागांच्या वतीने सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये जिल्ह्यातील २१ दिंड्यांना टाळ-मृदंगाचे वाटप, गोमातेसाठी चारा व पशुखाद्य, गरजूंना ब्लँकेट, अंध विद्यार्थ्यांना उबदार कपडे, रुग्णांना जीवनावश्यक वस्तू, अनाथ मुलांना फळवाटप आदी उपक्रमांचा समावेश होता.
आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावतीने शनिवार पेठ येथील शिवालय कार्यालयात जिल्ह्यातील २१ दिंड्यांना टाळ-मृदंगाचे वाटप करण्यात आले. वारकरी संप्रदायाची परंपरा जतन व्हावी, भजन-कीर्तन आणि धार्मिक परंपरांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांसोबतच धार्मिक व सांस्कृतिक परंपरेच्या संवर्धनालाही प्राधान्य देण्यात आले.
वाढदिवसाचे औचित्य साधून पांजरपोळ येथील गोमाता संस्थेस राजारामपुरी विभागाच्यावतीने चारा व पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते गोमातेचे पूजन करण्यात आले. वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांसोबतच धार्मिक व सांस्कृतिक परंपरेच्या संवर्धनालाही प्राधान्य देण्यात आले.
सायंकाळी शनिवार पेठ येथील शिवालय कार्यालयात आमदार राजेश क्षीरसागर यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार सुजित मिणचेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ. वैशाली क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हाप्रमुख रविंद्र माने, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, गटनेते शारंगधर देशमुख, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, शिक्षण सभापती शीला सोनुले, परिवहन सभापत सत्यजित जाधव, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, सौ.दिशा क्षीरसागर, सौ.पूजा क्षीरसागर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, संसदीय गटनेते खासदार श्रीकांत शिंदे, खासदार शाहू छत्रपती महाराज, उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रमुख मान्यवरांनी दूरध्वनीवरून आमदार राजेश क्षीरसागर यांना शुभेच्छा दिल्या.
——————————
शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि लोकसेवेचा वसा अखंडित जपणार : आ. क्षीरसागर
Mumbai
smoke
31
°
C
31
°
28.9
°
51 %
3.6kmh
20 %
Wed
30
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°

