कोल्हापूर :
सांगली येथील प्रीतम आनंद वृद्धाश्रम संस्थेस संजय घोडावत फौंडेशनतर्फे पायाभूत सोयी सुविधांसाठी व दैनंदिन खर्चासाठी आर्थिक मदत करण्यात आली. ही मदत दरमहा असणार आहे. वृद्धाश्रमाचे उदघाटन उद्योगपती संजय घोडावत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वस्त विनायक भोसले, सौ. विजयाताई पृथ्वीराज पाटील, अध्यक्ष अभिनय कामाजी उपस्थित होते. या वृद्धाश्रमासाठी आवश्यक ती सर्व मदत संजय घोडावत फौंडेशन करेल, असे आश्वासन संजय घोडावत यांनी दिले.
संपूर्ण समाजात कोणताही ज्येष्ठ नागरिक एकटेपणामुळे निराश, हताश होऊ नये आणि कोणत्याही आजी-आजोबांना आपलेपणा, आपुलकी, प्रेम जिव्हाळा व आत्मसन्मान देण्यासाठी सादर संस्था कार्य करेल असे अध्यक्ष अभिनय कामाजी यांनी सांगितले.
वृद्धाश्रमामध्ये बैठे खेळ कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, चित्रकला, हस्तकला, विणकाम, तबला, गिटार, हार्मोनियम पेटी, पियन बासरी, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, पोहण्यासाठी तलाव तसेच धार्मिक वाचनयासाठी वेगळा हॉल इ. विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
प्रीतम आनंदशाळा या ठिकाणी इनडोअर स्टेडिअमची व्यवस्था आहे. त्या ठिकाणी स्पोर्ट्स अकादमी सुरु करून देशभरातून मान्यवर क्रीडा प्रशिक्षक आणून यांचे मार्गदर्शनाखाली चांगले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्यावर भर असेल, असे संजय घोडावत यांनी सांगितले.
यावेळी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष कामाजी यांनी या उपक्रमास मदत केल्याबद्दल संजय घोडावत फौंडेशन व पदाधिकारी यांचे आभार मानले.
——————————
घोडावत फौंडेशनतर्फे प्रीतम आनंद वृद्धाश्रमास मदत
Mumbai
smoke
31
°
C
31
°
28.9
°
51 %
3.6kmh
20 %
Wed
30
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°

