Homeशैक्षणिक - उद्योग जिओची नववर्ष भेट!

जिओची नववर्ष भेट!

• ₹399 मध्ये 28 दिवस अनलिमिटेड 4G-5G डेटा
कोल्हापूर :
नववर्षाच्या स्वागतासाठी जिओने ग्राहकांना डेटा वापरावर कोणतीही मर्यादा नसलेली खास भेट दिली आहे. कंपनीने ‘हॅपी न्यू इयर 2.0’ अंतर्गत अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा देणारे नवे रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. यामध्ये 28 दिवसांसाठी अनलिमिटेड डेटा देणारा ₹399 चा नवा फ्लॅगशिप प्लॅन हे प्रमुख आकर्षण आहे. या प्लॅनमध्ये मोफत व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. व्हिडिओ स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंग किंवा सोशल मीडिया वापरताना डेटा संपण्याची चिंता ग्राहकांना राहणार नाही. जिओने आपल्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त सुरू केलेल्या उत्सवाचा विस्तार करत ही ऑफर सादर केली आहे.
वारंवार रिचार्ज करण्याची गरज टाळू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी जिओने ₹3,999 चा वार्षिक प्लॅन आणला आहे. एकदाच रिचार्ज केल्यावर तब्बल 365 दिवस अनलिमिटेड 4G-5G डेटा वापरता येणार आहे. या प्लॅनमध्येही मोफत व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतील. दोन्ही प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे 4G आणि 5G या दोन्ही नेटवर्कवर अनलिमिटेड डेटा वापरण्याची सुविधा. यासोबतच मनोरंजन, डिझाइन आणि क्लाउड स्टोरेजसारख्या डिजिटल सुविधांचाही लाभ मिळणार आहे.
इतर जिओ प्लॅन वापरणाऱ्या ग्राहकांसाठीही कंपनीने खास डेटा ऑफर आणल्या आहेत. काही काळासाठी अधिक डेटाची गरज असणारे ग्राहक ₹15 किंवा ₹25 चे अनलिमिटेड 5G डेटा ॲड-ऑन घेऊ शकतात. ₹15 च्या पॅकमध्ये एका दिवसासाठी, तर ₹25 च्या पॅकमध्ये दोन दिवसांसाठी अनलिमिटेड 5G डेटा मिळेल. या ॲड-ऑनमध्ये डेटा डाउनलोड किंवा वापरावर कोणतीही मर्यादा नसेल आणि इंटरनेटचा वेगही कमी केला जाणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
रात्री उशिरापर्यंत गेमिंग, चित्रपट-मालिका पाहणे किंवा काम करणाऱ्या ग्राहकांसाठी ₹50 चा नाइट डेटा पॅकही सादर करण्यात आला आहे. या पॅकमध्ये 28 दिवसांसाठी दररोज मध्यरात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अनलिमिटेड 4G-5G डेटा वापरता येईल. रात्री वापरलेला डेटा मुख्य प्लॅनमधील डेटा बॅलन्समधून वजा होणार नाही. त्यामुळे दिवसभराचा डेटा शिल्लक ठेवून ग्राहकांना रात्री इंटरनेटचा मुक्तपणे वापर करता येणार आहे.
डिजिटल सुविधांमध्ये ₹399 च्या फ्लॅगशिप प्लॅनसोबत 12 महिन्यांचे कॅनव्हा प्रो सबस्क्रिप्शन मिळणार आहे. या सबस्क्रिप्शनची नमूद किंमत ₹4,000 आहे. याशिवाय जिओहॉटस्टार मोबाईल + हॉलीवूड, जिओटीव्हीच्या माध्यमातून फॅनकोड, जिओगेम्स मोबाईल सबस्क्रिप्शन आणि जिओएआयक्लाउडवर 50 जीबी मोफत स्टोरेज मिळेल. जस्टडायल लाइट, हायपरलोकल कूपन्स आणि डिजिटल डायरीसारख्या सुविधांचाही यात समावेश आहे. तर ₹3,999 च्या वार्षिक प्लॅनमध्ये 12 महिन्यांचे कॅनव्हा प्रो लाइट, जिओहॉटस्टार, फॅनकोड आणि 50 जीबी क्लाउड स्टोरेज यांसारखे फायदे मिळतील.
₹399 आणि ₹3,999 चे नवे प्लॅन 24 नोव्हेंबरपासून मायजिओ ॲप, जिओची वेबसाइट, देशभरातील जिओ स्टोअर्स आणि रिटेलर्सकडे रिचार्जसाठी उपलब्ध होतील. ₹25 चा 5G डेटा ॲड-ऑनही याच दिवशी उपलब्ध होईल, तर ₹15 चा पॅक आधीपासूनच उपलब्ध आहे. ₹50 चा नाइट डेटा पॅक 26 नोव्हेंबरपासून ग्राहकांना घेता येईल.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
28.9 °
42 %
3.1kmh
20 %
Tue
31 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page