Homeशैक्षणिक - उद्योग संजय घोडावत विद्यापीठाचा रिलायन्स अ‍ॅनिमेशनशी सामंजस्य करार

संजय घोडावत विद्यापीठाचा रिलायन्स अ‍ॅनिमेशनशी सामंजस्य करार

कोल्हापूर :
डिझाईन, अ‍ॅनिमेशन आणि डिजिटल मनोरंजन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संजय घोडावत विद्यापीठाने रिलायन्स अ‍ॅनिमेशन स्टुडिओसोबत सोमवारी सामंजस्य करार केला. यावेळी स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजोनिधी भांडारे, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या करारांतर्गत विद्यापीठात बी.डिझाईन (B.Des.) इन ॲनिमेशन अँड व्हिज्युअल इफेक्ट्स (Animation & VFX) हा पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच गेमिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि चित्रपट निर्मिती (Filmmaking) या विषयांतील विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना सृजनशील शिक्षणासोबत उद्योगक्षेत्रातील व्यावहारिक अनुभव घेता येणार असून प्रत्यक्ष प्रकल्पांच्या माध्यमातून कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळणार आहे. तसेच ॲनिमेशन आणि डिजिटल कंटेंट निर्मितीमधील आधुनिक तंत्रज्ञान, व्यावसायिक कार्यपद्धती आणि निर्मिती प्रक्रियेची माहिती मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार स्वतःला सक्षम बनवता येईल.
या सामंजस्य कराराची प्रक्रिया विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी याबाबत सर्वांचे अभिनंदन केले आहे.
       ———-
या करारामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक विस्ताराला नवी दिशा मिळेल, तसेच कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सृजनशील शिक्षणाच्या क्षेत्रात ही एक नवी संधी ठरेल.
       – संजय घोडावत
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
28.9 °
42 %
3.1kmh
20 %
Tue
31 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °
Sat
28 °

Most Popular

You cannot copy content of this page