Homeकला - क्रीडादणदणीत विजयासह खंडोबा उपांत्य फेरीत

दणदणीत विजयासह खंडोबा उपांत्य फेरीत

कोल्हापूर :
सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळने संयुक्त जुना बुधवार पेठवर ५-० असा दणदणीत विजय मिळवत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. दोन गोल नोंदवून विजयात महत्त्वाची कामगिरी केलेला विष्णू मणिकंदम सामनावीर ठरला.
पाटाकडील तालीम मंडळ व डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने आणि कै. पांडबा जाधव व कै. रावसाहेब सरनाईक यांचे स्मरणार्थ ‘सतेज चषक २०२६’ फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर शुक्रवारी खंडोबा आणि जुना बुधवार यांच्यातील सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. पूर्वार्धात प्रथमेश गावडेच्या पासवर विष्णू मणिकंदमने संघाचा पहिला गोल २६व्या मिनिटाला केला. त्यानंतर २९व्या मिनिटास कुणाल दळवीने दिलेल्या पासवर प्रताप याने गोल नोंदवून आघाडी २-० अशी केली.
पूर्वार्धातील आघाडीच्या जोरावर उत्तरार्धात खंडोबाच्या खेळाडूंनी योग्य समन्वय साधून आणखी तीन गोलची आघाडी वाढवली. त्यामध्ये विष्णू मणिकंदमने दिलेल्या पासवर रोहित जाधवने संघाचा तिसरा गोल केला. ४४व्या मिनिटाला झालेल्या या गोलनंतर ५५व्या मिनिटाला सचिन एस.ने दिलेल्या पासवर पृथ्वीराज साळोखेने गोलरक्षकाला चकवा देत गोल नोंदवून आघाडी ४-० अशी भक्कम केली. त्यानंतर विष्णू मणिकंदमने वैयक्तिक दुसरा तर संघाचा पाचवा गोल ६३ व्या मिनिटाला केला. जुना बुधवारकडून मयूर सुतार, संकेत कांबळे, प्रथमेश जाधव, सचिन मोरे, शुभम जाधव यांनी गोलक्षेत्रात चढाया केल्या पण त्याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात ते अपयशी ठरले. अखेर उर्वरित वेळेत ५-०ची आघाडी राखत खंडोबाने सामना जिंकला.
——————————————————-
आजचा सामना…
• दिलबहार – फुलेवाडी : दुपारी ४ वाजता

RELATED ARTICLES
Mumbai
haze
29 ° C
29 °
29 °
70 %
2.1kmh
0 %
Fri
29 °
Sat
30 °
Sun
30 °
Mon
29 °
Tue
29 °

Most Popular

You cannot copy content of this page