Homeकला - क्रीडादिशा पाटीलची १७ वर्षाखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड     

दिशा पाटीलची १७ वर्षाखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड     

                                        कोल्हापूर :
जयसिंगपूरच्या दिशा पाटीलची १७ वर्षाखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा अहमदाबाद (गुजरात) येथे ३० मार्च ते ७ एप्रिल दरम्यान होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य १७ वर्षाखालील मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत जयसिंगपूर च्या दिशा पाटीलने आठ पैकी सहा गुण मिळवून अपराजित रहात उपविजेतेपद पटकाविले. छत्रपती संभाजीनगरची सानी देशपांडे साडेसहा गुणासह अजिंक्य ठरली. या यशामुळे सानीची व दिशाची अहमदाबाद (गुजरात) येथे ३० मार्च ते ७ एप्रिल दरम्यान होणाऱ्या १७ वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
जयसिंगपूरच्या दिशा पाटील ने यापूर्वी दोन शवेळा शालेय राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राला रौप्यपदक मिळवून दिले आहे. त्याचबरोबर गोंदिया येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर निवड बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते. दिशा जयसिंगपूर येथील जयप्रभा इंग्लिश मेडियम ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत शिकत आहे. कॉलेजच्या प्राचार्या सौ. स्मिता पाटील व क्रीडा शिक्षक राहुल सरडे, चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, सचिव व फिडे इन्स्ट्रक्टर मनिष मारुलकर, दिशाची आई कविता पाटील व वडील शरद पाटील या सर्वांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले तर बुद्धिबळ प्रशिक्षक इचलकरंजीचे रोहित पोळ, कोल्हापूरचे उत्कर्ष लोमटे व सोलापूरचे सुमुख गायकवाड यांचे विशेष बुद्धिबळ प्रशिक्षण दिशाला आजपर्यंत लाभले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
31 °
35 %
4.6kmh
0 %
Sat
31 °
Sun
30 °
Mon
31 °
Tue
29 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page