Homeराजकियआठवड्यातील सातही दिवस कोल्हापूर-मुंबई मार्गावर स्लिपर वंदे भारत रेल्वे सुरू करावी

आठवड्यातील सातही दिवस कोल्हापूर-मुंबई मार्गावर स्लिपर वंदे भारत रेल्वे सुरू करावी

• सह्याद्री एक्सप्रेस पूर्ववत मुंबईपर्यंत धावावी : खा.धनंजय महाडिक
कोल्हापूर :
नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात बुधवारी खासदार धनंजय महाडिक यांनी, कोल्हापूर ते पुणे या मार्गावर आठवड्यातील तीन दिवस सकाळी सुरू असलेली वंदे भारत एक्सप्रेस, आठवड्यातील सातही दिवस मुंबईपर्यंत न्यावी. तसेच रात्री कोल्हापुरातून वंदे भारत एक्सप्रेस सुटावी आणि सकाळी लवकर मुंबईत पोचावी, अशी मागणी केली. तसेच कोव्हीड काळापासून बंद झालेली कोल्हापूर-मुंबई सहयाद्री एक्सप्रेस सध्या केवळ पुण्यापर्यंत जाते. ही रेल्वेसुध्दा पूर्ववत मुंबईपर्यंत सोडावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली आहे.
संसदेच्या अधिवेशनात खा. धनंजय महाडिक यांनी एका लेखी प्रश्‍नाद्वारे कोल्हापूरच्या एका महत्वाच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. सध्या आठवड्यातून तीन दिवस सकाळच्या सत्रात कोल्हापूर-पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावते. एकिकडे कोल्हापूर ते मुुंबई या मार्गावर महालक्ष्मी एक्सप्रेस एकच रेल्वे गाडी सुरू असून, मुंबईसाठी आणखी एक रेल्वे गाडीची नितांत आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर स्लिपर कोच असलेली वंदे भारत एक्सप्रेस दैनंदिन स्वरूपात सुरू व्हावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली.
कोल्हापूर ते मुंबई मार्गावरील रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो. तरीही कोव्हिड काळापासून कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर धावणारी सह्याद्री एक्सप्रेस सध्या केवळ पुण्यापर्यंतच जाते. नव्या रेल्वे गाड्यांची आवश्यकता असताना, जुन्या रेल्वे एक्सप्रेस मर्यादित करू नयेत, तसेच रोज वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी, जेणेकरून कोल्हापूरच्या उद्योग, पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असे खासदार महाडिक यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
27 ° C
27 °
27 °
65 %
4.1kmh
40 %
Thu
27 °
Fri
27 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
30 °

Most Popular

You cannot copy content of this page