कोल्हापूर :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६’ आणि ‘जागतिक महिला दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात शेडशाळ (ता. शिरोळ) येथील स्व. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील महिला फाउंडेशन बीजबँकेचा सन्मान करण्यात आला. बीजमाता शमशादबी पठाण आणि वैशाली संकपाळ यांनी हा सन्मान स्विकारला. स्थानिक बियाणे जतन आणि संवर्धनासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते हा सत्कार झाला.
एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन, चेन्नई च्या अध्यक्षा तथा जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामिनाथन, पुणे येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा स्मार्ट प्रकल्पाच्या तज्ञ कृषी व्यवसाय व्यवस्थापन अधिकारी सौ. उज्वला बानखिले, एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या वरिष्ठ फेलो डॉ. आर. व्ही. भवानी, भारतीय वन सेवेच्या अधिकारी व उपवनसंरक्षक सुवर्णा माने आदिंची उपस्थिती होती. बीज बॅंकेच्या शर्मिला केरीपाळे, आक्काताई मगदूम, शेवंती चौगुले, दत्त साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील आदी उपस्थित होते.
या चळवळीला श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली बीज बँकेचे काम विस्तारित आहे. त्यांनी देशी बियाण्यांचे महत्त्व आणि त्याचे पर्यावरणीय व आर्थिक फायदे महिलांना पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बीज बॅंक सध्या कार्यरत आहे. आज या बीजबँकेत विविध पिकांचे शंभरहून अधिक देशी वाण सुरक्षित आहेत. राज्यभर मागणीनुसार हे वाण वितरीत केले जात आहेत.
राहुरी येथे स्व. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील महिला फाउंडेशन बीजबँकेचा सन्मान
Mumbai
clear sky
27.9
°
C
27.9
°
27.9
°
70 %
1.5kmh
0 %
Wed
28
°
Thu
30
°
Fri
30
°
Sat
28
°
Sun
28
°

