Homeराजकियभाजप युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे जल्लोषात स्वागत

भाजप युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे जल्लोषात स्वागत

भाजप युवा मोर्चाचे नुतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे जल्लोषात स्वागत
• वर्षभरात एक लाख युवक-युवतींना भाजपशी जोडणार : कृष्णराज महाडिक
कोल्हापूर :
भाजप युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे रविवारी कोल्हापुरात आगमन झाले. युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांची तरूणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. त्यामुळे कृष्णराज महाडिक यांच्या स्वागतासाठी छत्रपती ताराराणी चौक येथे प्रचंड गर्दी झाली होती. महाराणी ताराराणी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भव्य रॅली काढून कृष्णराज महाडिक यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे फोटो असलेले फलक आणि भाजपाचा ध्वज हातात घेतलेल्या तरूणाईमध्ये सळसळता उत्साह होता. पक्षाने टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवणार असल्याचे सांगत, वर्षभरात एक लाख युवक-युवतींना भाजपाशी जोडण्यात येईल आणि भाजप युवा मोर्चाचे संघटन राज्यात मजबूत करणार असल्याचे नूतन प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नमुद केले. रॅलीनंतर भाजप जिल्हा कार्यालयात कृष्णराज महाडिक यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आणि युवावर्गाने मोठी गर्दी केली होती.
कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. राज्यस्तरावरील प्रदेशाध्यक्षासारखं महत्वाचे पद कोल्हापुरला मिळाल्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि तरूणाईमध्ये प्रचंड उत्साह आहे. छत्रपती ताराराणी चौक कार्यकर्त्यांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता. सायंकाळी पाच वाजता कृष्णराज महाडिक यांचे छत्रपती ताराराणी चौकात आगमन झाले. भागीरथी महिला संस्थेच्यावतीने कृष्णराज महाडिक यांचे औक्षण करण्यात आले. छत्रपती ताराराणी यांच्या पुतळयाला अभिवादन करून, रॅलीला सुरवात झाली. सजवलेल्या वाहनावर कृष्णराज महाडिक यांच्यासोबत खासदार धनंजय महाडिक, महापौर रूपाराणी निकम, प्रा. जयंत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, महानगराध्यक्ष विजय जाधव, मुरलीधर जाधव यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते होते.
ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन मार्गे रॅली व्हिनस कॉर्नर चौकात आली. याठिकाणी कृष्णराज महाडिक यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला फुलं अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आईसाहेब महाराज पुतळा मार्गे ही रॅली बिंदू चौकात आली. बिंदू चौकातील शाहू, फुले, डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पुष्पहार अर्पण केला. रॅलीच्या मार्गात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
या रॅलीत चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, भिमा कारखान्याचे चेअरमन विश्‍वराज महाडिक, नगरसेवक विजयसिंह देसाई, माधुरी नकाते आदींसह भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, भाजपाचे पदाधिकारी तसेच युवा मोर्चाचे राज्यभरातील आणि जिल्ह्यातील पदाधिकारी सहभागी झाले होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
27.2 ° C
27.2 °
27.2 °
53 %
4.1kmh
6 %
Wed
31 °
Thu
30 °
Fri
29 °
Sat
29 °
Sun
29 °

Most Popular

You cannot copy content of this page