Homeकला - क्रीडालॉन टेनिस स्पर्धेत रौनक श्रेष्ठी व चाहत ठाकूर विजेते

लॉन टेनिस स्पर्धेत रौनक श्रेष्ठी व चाहत ठाकूर विजेते

कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन आयोजित व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन च्यावतीने सरदार मोमीन मेमोरियल चॅम्पियनशीप सिरीज लॉन टेनिस स्पर्धेत रौनक श्रेष्ठी व चाहत ठाकूर यांनी विजेतेपद पटकावले.
१४ वर्षाखालील मुले व मुलींच्या स्पर्धा केएसएच्या साठमारी येथील टेनिस कॉम्लेक्स येथे पार पडल्या. या नॉकाऊट स्पर्धेत पुणे, सोलापूर, मुंबई, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक व कोल्हापूर येथील मानांकित स्पर्धक सहभागी झाले होते.
मुलांचे व मुलींचे एकेरी व दुहेरी असे एकूण ४० सामने खेळविण्यात आले. मुलांच्या एकेरी अंतिम फेरीत रौनक श्रेष्ठी    (मुंबई) वि. वि. श्रेयस अव्युक्त (मुंबई) तर       मुलींच्या एकेरी अंतिम फेरीमध्ये चाहत ठाकूर (मुंबई) वि. वि. किर्तीयाणी घटकर (मुंबई) यांनी यश मिळवले.
मुलांच्या दुहेरी अंतिम फेरीत अखिलेश चव्हाण (कोल्हापूर) वि. वि. श्रेयस अव्युक्त (मुंबई), आदित्य जाधव (कोल्हापूर)          रौनक श्रेष्ठी (मुंबई) तसेच मुलींच्या दुहेरी अंतिम फेरीत चाहत ठाकूर (मुंबई) वि. वि.   इन्सिया कमल (नागपूर), किर्तीयाणी घटकर (मुंबई) देवश्री दगवार (नागपूर) यांनी यश संपादन केले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी व टुर्नामेंट डायरेक्टर माणिक मंडलिक व ऑन.फायनान्स सेक्रेटरी नंदकुमार बामणे यांच्या हस्ते झाला. यावेळी एमएसएलटीए सुपरवायझर मेहुल केनिया व पंच प्रकाश पाटील उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
haze
24 ° C
24 °
24 °
69 %
2.1kmh
20 %
Wed
25 °
Thu
26 °
Fri
27 °
Sat
28 °
Sun
26 °

Most Popular

You cannot copy content of this page