कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात वेताळमाळ तालीम मंडळने दिलबहार तालीम मंडळवर ३ विरूध्द २ गोलने विजय मिळवला. दिलबहारचा हा सलग सातवा पराभव झाल्याने शून्य गुण आहेत. यामुळे
सिनियर सुपर – ८ गटातील स्थान धोक्यात आले. तत्पूर्वी झालेल्या सामन्यात प्रॅक्टीस फुटबॉल क्लबने पाटाकडील तालीम मंडळ (ब)वर ७-१ असा दणदणीत विजय मिळवला.
छत्रपती शाहू स्टेडियमवर दुपारच्या सत्रात वेताळमाळ आणि दिलबहार सामना झाला. वेताळमाळकडून झालेल्या चढाईत आकाश मोरेने दिलेल्या पासवर आकाश माळीने गोल नोंदवून १५व्या मिनिटास संघाला आघाडीवर नेले. त्या गोलची परतफेड दिलबहारकडून ३५व्या मिनिटाला झाली. स्वयंम साळोखेच्या पासवर फेबिन गिब्सने गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला.
उत्तरार्धात ५०व्या मिनिटाला मिताईने गोल नोंदवून वेताळमाळला २-१ची आघाडी मिळवून दिली. जादावेळेत सर्वेश वाडकरने गोल करून आघाडी ३-१ अशी भक्कम केली. त्यानंतर दिलबहारकडून झालेल्या चढाईत वेताळमाळच्या गोलक्षेत्रात पार्थ मोहितेचा हॅण्डबॉल झाल्याने मुख्यपंचानी पेनल्टी किक दिली. त्यावर प्रथम भोसलेने अचूक गोल नोंदवला. आघाडी ३-२ वर आली. त्यानंतर सामन्याचा वेळ संपला आणि वेताळमाळने विजयावर शिक्कामोर्तब केले.
प्रॅक्टीसचा दणदणीत विजय…
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात आकाश बावकरने नोंदवलेल्या चार गोलच्या जोरावर प्रॅक्टीस क्लबने पाटाकडील (ब)वर ७ विरूध्द १ गोलने दणदणीत विजय मिळवला. पूर्वार्धात आकाश बावकरने १३ व्या आणि १५व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १८ व्या मिनिटाला केवल कांबळेने गोल करून आघाडी ३-० अशी वाढवली. २० व्या आणि २६व्या मिनिटास साहिल डाकवेने गोल नोंदवून आघाडी ५-० अशी भक्कम केली. उत्तरार्धात पाटाकडील (ब) कडून महम्मद सैफने ५६व्या मिनिटास गोल नोंदवून आघाडी ५-१ वर आणली. त्यानंतर आकाश बावकरने ५७व्या मिनिटाला वैयक्तिक तिसरा तर संघाचा सहावा गोल केला. पाठोपाठ ६४व्या मिनिटाला त्याने वैयक्तिक चौथ्या तर संघाच्या सातव्या गोलची नोंद केली. उर्वरित वेळेत ७-१ची आघाडी कायम राखून प्रॅक्टीस क्लबने विजय मिळवला.
——————————
• फुलेवाडी – उत्तरेश्वर : दुपारी १:३० वा.
• शिवाजी – जुना बुधवार : दुपारी ४ वा.
वेताळमाळ आणि प्रॅक्टीस क्लब विजयी
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28
°
C
28
°
28
°
60 %
3.1kmh
25 %
Mon
28
°
Tue
27
°
Wed
27
°
Thu
27
°
Fri
27
°

