कोल्हापूर :
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी सिद्धी राजाध्यक्ष हिने फरीदाबाद (दिल्ली) येथील आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली.
या प्रतिष्ठित स्पर्धेत विविध देशांतील नामांकित व अनुभवी खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये सिद्धीने सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत, शिस्त, आत्मविश्वास आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर वर्चस्व सिद्ध केले. काता आणि कुमिते प्रकारात तिने दोन सुवर्ण पदके प्राप्त केली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र कुलपती ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, विभागप्रमुख डॉ. तानाजीराव मोहिते-पाटील यांनी सिद्धीचे अभिनंदन केले आहे.
——————————
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या सिद्धी राजाध्यक्षचे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णयश
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
54 %
2.6kmh
20 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
26
°

