कोल्हापूर :
डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी तळसंदे येथे ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू आणि डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील, टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. आर. एस. पावसकर यांची उपस्थिती होती.
डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते ध्वजवंदन झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. डॉ. गुप्ता यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी हॉस्टेल विद्यार्थ्यांसाठी क्लीन रूम स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता स्पर्धा घेण्यात आली. यातील विजेत्याना डॉ. गुप्ता व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आहे.
यावेळी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार, पी. एस. पाटील, जयवंत जगताप, अमोल गाताडे, डॉ. संग्राम पाटील, डॉ. जयदीप पाटील, डॉ. उत्कर्ष आवळेकर यांच्यासह अधिष्ठाता, विविध संस्थांचे प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
26.5
°
C
26.5
°
26.5
°
66 %
2.6kmh
2 %
Sun
26
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
27
°
Thu
28
°

