• सैनिक गिरगाव येथे डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचे श्रमसंस्कार शिबीर
कोल्हापूर :
राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि गावाशी नातं जोडण्याची भावना निर्माण होते. केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे तर प्रत्यक्ष समाजकार्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन सैनिक गिरगावचे सरपंच महादेव कांबळे यांनी केले.
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागच्यावतीने १६ ते २२ जानेवारी या कालावधीत गिरगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोप प्रसंगी महादेव कांबळे यांनी मार्गदर्शन केले. शिबिराच्या कालावधीत राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान, जनजागृती उपक्रम, सर्वेक्षण व विविध सामाजिक कार्याबद्दल त्यांनी एनएसएस स्वयंसेवकांचे विशेष कौतुक केले.
यावेळी उपसरपंच सौ. शुभांगी कोंडेकर, ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील, उत्तम नवाळे, आजी माजी सैनिक संघटनेचे प्रकाश पाडळकर, संभाजीराव साळुंखे, विद्या मंदिर, गिरगावच्या कविता पाटील, महाविद्यालयाचे स्थापत्य विभाग प्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश चौगुले आदी उपस्थित होते.
सात दिवस चाललेल्या या शिबिरादरम्यान गिरगाव गावातील स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, कॅन्सरविषयी जनजागृती, आरोग्य शिबिर, उन्नत भारत अभियान अंतर्गत घरगुती सर्वेक्षण असे उपक्रम राबविण्यात आले. तसेच अवयव दान, वैद्यकीय व कायदेशीर पैलू, चला तणावमुक्त जगूया, कॅन्सरविरुद्ध एकत्र लढूया, देवराई, गडकिल्ले, निसर्ग आणि मानव, ग्रामीण कथाकथन आदी विषयांवर नामवंत व्याख्यात्यांची व्याख्याने झाली. या शिबिरासाठी एनएसएस स्वयंसेवक अजिंक्य मांगोरे, पद्मनिष पाटील, तनिष सावंत, ओमकार पाटील, सेजल खोत, प्रज्ञा मोरे, अर्पिता शिंदे व सानिका टोपकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आणि डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठचे प्र कुलपती ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक व डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठचे कुलगुरू डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, डीन (स्टूडंट अफेअर्स) डॉ. राहुल पाटील यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
——————————
एनएसएसमुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा निर्माण होईल : सरपंच महादेव कांबळे
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
60 %
2.1kmh
100 %
Wed
24
°
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°

