कोल्हापूर :
पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगड येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचा खेळाडू यश खंडागळेने ७१ किलो वजनी गटात स्नॅच १३४ व क्लीन अँड जर्क १६० असे एकूण २९४ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले.
तसेच, महिलांच्या ५८ किलो वजनी गटात निकिता कमलाकर हिने एकूण १८१ किलो वजन उचलून ६वा क्रमांक मिळवला. या दोघांची खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेसाठी निवड झाली.
संघ व्यवस्थापक म्हणून देवचंद महाविद्यालयाचे डॉ. रवींद्र चव्हाण व प्रशिक्षक म्हणून श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी व प्रभारी प्र -कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि क्रीडा संचालक प्रा. डॉ. शरद बनसोडे यांनी अभिनंदन केले आहे.
——————————
अ. भा. आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला सुवर्णपदक
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
60 %
2.1kmh
100 %
Wed
24
°
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°

