Homeकला - क्रीडामहिला टेनिस स्पर्धेच्या करंडकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

महिला टेनिस स्पर्धेच्या करंडकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

कोल्हापूर :
येत्या २ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत मुंबई येथे होणाऱ्या एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १२५ डॉलर महिला टेनिस स्पर्धा मालिकेच्या पाचव्या सत्राच्या करंडकाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या करंडकाचा अधिकृत अनावरण समारंभ फडणवीस यांच्या निवासस्थानी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पार पडला.
याप्रसंगी स्पर्धेच्या पेट्रन अमृता फडणवीस, लार्सन अँड टर्बो लिमिटेडचे संचालक व वरिष्ट कार्यकारी उपाध्यक्ष एस. व्ही. देसाई तसेच मुख्य संपर्क अधिकारी सुमित चॅटर्जी, प्रवीण दराडे (आयएएस), पल्लवी दराडे (आयआरएस), एमएसएलटीएचे अध्यक्ष प्रशांत सुतार आणि एमएसएलटीएचे चेअरमन भरत ओझा आदींसह महाराष्ट्रातील गुणवान उदयोन्मुख खेळाडू व जागतिक विद्यापीठ स्पर्धेतील कांस्य पदक विजेती वैष्णवी आडकर, भारतीय फेड कप संघांच्या प्रशिक्षिका राधिका तुळपुळे – कानिटकर यांचीही विशेष उपस्थिती होती.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १२५ डॉलर महिला टेनिस स्पर्धा मालिकेच्या पाचव्या सत्राचे आयोजन करताना आम्हाला आनंद व अभिमान वाटत आहे. या स्पर्धेच्या गेल्या चार सत्रांमध्ये माया राजेश्वरन, अंकिता रैना, श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती आणि अन्य भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी बजावली होती. यंदाच्या सत्रातही भारतीय खेळाडू उत्तम कामगिरी बजावतील असा मला विश्वास वाटतो. मी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना आणि विशेषतः भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देऊ इच्छितो.
एमएसएलटीएचे अध्यक्ष प्रशांत सुतार म्हणाले की, एल अँड टी मुंबई ओपन स्पर्धा ही अल्पावधीतच भारतातील एक महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा बनली आहे. स्पर्धेच्या पाचव्या सत्राचे आयोजन करणे ही एमएसएलटीएसाठी अभिमानाची बाब आहे. स्पर्धेला सातत्याने सर्वोतोपरी पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे ऋणी आहोत. महाराष्ट्र शासनाच्या भागीदारीमुळे आम्हाला भारतीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा आणि व्यासपीठ उपलब्ध करून देता आले आहे. तसेच, राज्यातील टेनिसच्या विकासासाठी अर्थपूर्ण योगदान देण्यात आम्हाला मोलाचा वाटा उचलता आला आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
60 %
2.1kmh
100 %
Wed
24 °
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °

Most Popular

You cannot copy content of this page