Homeकला - क्रीडाबालगोपाल - सम्राटनगर सामना बरोबरीत

बालगोपाल – सम्राटनगर सामना बरोबरीत

• रंकाळा तालीमचा सुभाषनगरवर एकतर्फी विजय
कोल्हापूर :
अखेरपर्यंत चुरशीने खेळला गेलेला बालगोपाल तालीम मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स सामना पूर्णवेळेत २-२ गोल बरोबरीत राहिला. सामना बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. बालगोपालचे एकूण पाच गुण तर सम्राटनगरचे सहा गुण झाले. कमीत कमी गुण झाल्यामुळे बालगोपालचे सिनियर सुपर – ८ गटातील स्थान धोक्यात आले. तत्पूर्वी झालेल्या सामन्यात रंकाळा तालीम मंडळने सुभाषनगर फुटबॉल क्लबवर ४-० असा एकतर्फी विजय मिळवला.
दरम्यान, पाटाकडील (ब) आणि सुभाषनगर संघादरम्यान दि. २४ जानेवारीला सामना झाला. या सामन्यात पाटाकडील (ब) च्या गुरुराज काटकर आणि सुभाषनगरच्या आदर्श व्ही.जे. यांना रेडकार्ड दाखविण्यात आले होते. त्यांच्यावर आता कारवाई केली आहे. त्यामध्ये आदर्श व्ही.जे. याला पुढील तीन सामने खेळण्यास बंदी घातली आहे. तसेच २००० रुपये दंड केला आहे. गुरुराज काटकरला एक सामना खेळण्यास बंदी घातली आहे.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. मंगळवारी सातव्या फेरीतील सामने सुरू झाले. बालगोपाल आणि सम्राटनगर सामना चुरशीचा झाला. सम्राटनगरकडून पूर्वार्धात ११व्या मिनिटाला मोहित घोरपडेने दिलेल्या पासवर ओमकार जाधवने गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. बालगोपालकडून २४व्या मिनिटास सुजित राजगोपालनच्या पासवर अभिनव साळोखेने गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला.
उत्तरार्धात गोलची आघाडी वाढवण्यासाठी दोन्ही संघाकडून वेगवान खेळ झाला. त्यामध्ये ओमकार जाधवच्या पासवर मोहित घोरपडेने गोल नोंदवून ४७व्या मिनिटाला संघाला २-१ असे आघाडीवर नेले. बालगोपालच्या देवराज मंडलिकने सेंटर सर्कलच्या पुढे मिळालेल्या फ्रीकिकवर चेंडूला थेट गोलजाळ्याची दिशा दाखवत संघाला २-२ अशी बरोबरी साधून दिली. ५७व्या मिनिटाला सामना बरोबरीत आल्यावर दोन्ही संघांनी गोलची आघाडी घेण्यासाठी वेगवान चाली रचल्या. बालगोपालच्या सुजित राजगोपालन, अभिनव साळोखे, विश्वविजय घोरपडे, देवराज मंडलिक यांनी तर सम्राटनगरकडून यासिन नदाफ, ओमकार जाधव, सोहम साळोखे, मोहित घोरपडे, निरंजन कामते, प्रसाद साबळे यांनी केलेल्या चढायांना यश आले नाही. अखेर पूर्णवेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटला.
रंकाळा तालीम एकतर्फी विजयी…
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात रंकाळा तालीमने सुभाषनगरवर ४-० असा एकतर्फी विजय मिळवला. पूर्वार्धात गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या सामन्याची कोंडी उत्तरार्धात फुटली. पी. सी. कृष्णाजने ५०व्या मिनिटाला संघाचा पहिला गोल फलकावर झळकवला. लगेचच ५५व्या मिनिटाला मेहराज उदीनने गोल नोंदवून आघाडी २-० अशी वाढवली. पाठोपाठ ५९व्या मिनिटास कृष्णाजने वैयक्तिक दुसरा तर संघाचा तिसरा गोल केला. ६१व्या मिनिटाला मेहराज उदीनने वैयक्तिक दुसरा तर संघाचा चौथा गोल नोंदवून आघाडी भक्कम केली. उर्वरित वेळेत सुभाषनगरच्या खेळाडूंना गोलची परतफेड करता आली नाही. अखेर रंकाळा तालीमने एकतर्फी विजय मिळवला.
——————————————————-
    आजचे सामने…
• पीटीएम (ब) – प्रॅक्टीस : दुपारी १:३० वा.
• दिलबहार – वेताळमाळ : दुपारी ४ वा.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
60 %
2.1kmh
100 %
Wed
24 °
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °

Most Popular

You cannot copy content of this page