Homeसामाजिकहुतात्मा शंकरराव तोरस्कर यांना ७०व्या स्मृतिदिनी अभिवादन

हुतात्मा शंकरराव तोरस्कर यांना ७०व्या स्मृतिदिनी अभिवादन

कोल्हापूर :
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कोल्हापूरातील पहिले हुतात्मे शंकरराव तोरस्कर यांना ७०व्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले. प्रतिवर्षीप्रमाणे हुतात्मा शंकरराव तोरस्कर कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट व कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने जुना बुधवार पेठ येथील तोरस्कर चौकातील त्यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले.
प्रतिमा पूजन शंकरराव तोरस्कर यांचे बंधू विलासराव दत्तोबा तोरस्कर, नगरसेवक प्रकाश गवंडी, नगरसेवक प्रताप जाधव, नगरसेविका शिला अशोक सोनुले, नगरसेवक रिंकू देसाई, नगरसेविका मंगल  साळोखे, नगरसेवक बबन मोकाशी, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, सुरेश ढोणुक्षे,  ईब्राहिम मुल्ला, दिपक काटकर, संदिप देसाई, सुशिल भांदिगरे, अर्जुन आंबी, रमेश पोवार, मनपाचे कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, गणेश जाधव, भास्कर कदम, महेश कदम, संजय काटकर व भागातील नागरिक यांच्या उपस्थितीत झाले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ट्रस्टचे सचिव संजय तोरस्कर यांनी केले. संयोजन मनोज तोरस्कर, संजय तोरस्कर, अमर तोरस्कर, संग्राम तोरस्कर, शिवराज तोरस्कर, शिवतेज तोरस्कर आणि तोरस्कर कुटुं‌बीय व मित्र परिवाराने केले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
60 %
2.1kmh
100 %
Wed
24 °
Thu
26 °
Fri
26 °
Sat
25 °
Sun
26 °

Most Popular

You cannot copy content of this page