• कोथळीत १०० एकर क्षेत्र क्षारपडमुक्त करण्याच्या कामाला प्रारंभ
कोल्हापूर :
जमीन क्षारपडमुक्तीचे काम दीर्घकाळ टिकवायचे असेल तर एक खंबीर संस्था स्थापन करणे अत्यंत गरजेची आहे. निचरा प्रणालीची देखभाल, संघटनात्मक बांधणी व सातत्य राखण्यासाठी संस्थेची भूमिका महत्त्वाची आहे. आज क्षारपडमुक्तीचे कार्य देशभर पसरले असून, त्याची सुरुवात आपल्या तालुक्यातून झाली आहे. जमीन क्षारपडमुक्त करून पुढच्या पिढीला सुपीक जमीन देण्यासाठी सच्छिद्र निचरा प्रणाली अत्यावश्यक आहे, असे मत श्री दत्त साखर कारखान्याचे प्रमुख, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी व्यक्त केले.
कोथळी (ता. शिरोळ) येथे क्षारपड जमिनी क्षारपडमुक्त करण्यासाठी १०० एकर क्षेत्रावर सच्छिद्र निचरा प्रणाली (ड्रेनेज सिस्टीम) उभारणीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
क्षारपडमुक्तीसाठी लागेल ती सर्व मदत केली जाईल. कारखान्याच्या माध्यमातून मार्गदर्शन व सहकार्य दिले जाईल. मात्र या कामात कुठेही थांबू नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
राजगोंडा पाटील म्हणाले की, गणपतरावदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात आतापर्यंत सुमारे दहा हजार एकर जमीन क्षारपडमुक्त करण्यात आली आहे. या कामाची दखल शासनाने घेतल्याने भविष्यात शेतकऱ्यांना विविध सवलतींचा लाभ होणार आहे.
स्वागत व प्रास्ताविक करताना ऋषभ पाटील यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. माळी मळा, मगदूम मळा, मुदकान्ना, संकाई, डुम, सावकर, बुरले, देखांण्णा मळा, इंगळे मळा या परिसरातील एकूण १०० एकर क्षेत्र या प्रकल्पातून क्षारपडमुक्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आभार प्रकाश पुजारी यांनी मानले.
कार्यक्रमास श्री दत्त साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, इंजिनियर कीर्तीवर्धन मरजे, संजय पाटील कोथळीकर, धनगोंडा पाटील, रामचंद्र शिंदे, ज्योती कांबळे, संदीप कांबळे, दादासो चुडाप्पा, भीमगोंडा बोरगावे, गौतम पाटील, अशोक पुजारी, राजीव विभूते यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————
जमीन क्षारपडमुक्तीसाठी सच्छिद्र निचरा प्रणाली अत्यावश्यक : गणपतराव पाटील
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
56 %
0kmh
64 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

