Homeइतरपंचायत समिती राधानगरीसाठी सौ. लता एकावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पंचायत समिती राधानगरीसाठी सौ. लता एकावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर :
पंचायत समिती राधानगरीसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सौ. लता प्रल्हाद एकावडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सौ. एकावडे यापूर्वी राधानगरी ग्रामपंचायतमध्ये दोनवेळा अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत.
राधानगरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी फक्त एकच अर्ज दाखल झाला आहे. ८४ लोकांनी २१९ अर्ज नेले आहेत. नागरिकांनी निवडणूक आचारसंहितेच काटेकोर पालन करण्याचे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता देशमुख यांनी केले आहे.
राधानगरी तालुक्यातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी दुपारपर्यंत ८४ इच्छुकांनी २१९ उमेदवारी अर्ज नेले आहेत. अर्ज भरण्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी एकाच इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल केला आहे. पंचायत समिती राधानगरीसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सौ. लता प्रल्हाद एकावडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सौ. लता एकावडे यांनी यापूर्वी राधानगरी ग्रामपंचायतमध्ये दोनवेळा अपक्ष म्हणून निवडून येत आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
सौ. लता एकावडे या राधानगरी येथील एकावडे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली वीस वर्षाहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या सामाजिक कामाच्या जोरावरच मला जनता निवडून देईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. यावेळी प्रल्हाद एकावडे, प्रणित एकावडे, प्रसाद एकावडे, वृषाली एकावडे, ऋतुराज एकावडे, सुरेखा सुतार, मंदाताई पन्हाळकर आदी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
haze
23 ° C
23 °
23 °
73 %
2.1kmh
18 %
Sun
24 °
Mon
24 °
Tue
25 °
Wed
26 °
Thu
25 °

Most Popular

You cannot copy content of this page