कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक – २०२६च्या कामी मतदान साहित्य व कर्मचारीवर्ग मतदान केंद्रावर पोहोचवणे व परत आणणे इत्यादी आवश्यक कामगिरीसाठी महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बुधवारी (दि.१४) व गुरुवारी (दि.१५) केएमटी बससेवेत कपात करण्यात आली आहे.
महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेस अधिग्रहीत करण्यात आल्यामुळे बुधवारी (दि.१४) सकाळपासून दुपारी ४ वाजेपर्यंत व गुरुवारी (दि.१५) दुपारी २ वाजल्यानंतर सर्व मार्गावरील केएमटी बसेसच्या सर्वच फेऱ्यामध्ये या कपात होणार आहे. दि.१४ जानेवारी व दि.१५ जानेवारी रोजी रद्द होणाऱ्या फेऱ्यांचा विचार करुन सर्व प्रवासी नागरिकांनी ४० रुपयेचा एकदिवसीय पास खरेदी करताना आपली गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊनच एकदिवसीय पास खरेदी करावा.
तरी, सर्व प्रवासी नागरिकांनी वर नमूद तारखांना उपलब्ध होणाऱ्या बससेवेद्वारे प्रवास करुन होणारी गैरसोय लक्षात घेऊन परिवहन उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन उपक्रमामार्फत करणेत येत आहे.
बुधवार व गुरुवारी केएमटी बससेवेत कपात
Mumbai
haze
26
°
C
26
°
26
°
73 %
2.6kmh
0 %
Fri
26
°
Sat
26
°
Sun
25
°
Mon
25
°
Tue
25
°

