• पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामिण भागात कायदा सुव्यवस्थेची कार्यक्षमता वाढणार
कोल्हापूर :
वेगाने विकसित होत असलेल्या शहरी परिस्थितीमुळे जगभरातील कायदा अंमलबजावणी संस्था त्यांच्या कामकाजाची कार्यक्षमता, वेग आणि आपत्कालीन प्रतिसादात क्षमता वाढविण्यासाठी अधिकाधिक अत्याधुनिक सुविधांनी सज्ज मोटरसायकलींचा अवलंब करत आहे. या गतीशी आणि काळाच्या गरजेनुसार पुणे पोलिसांनी त्यांच्या उपनगरांसह पिंपरी- चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी सोमवारी ‘डोमिनार ४००’ या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज १०० मोटरसायकलींचा ताफा दाखल केला.
जगातील सर्वात मौल्यवान दोन आणि तीन-चाकी वाहन कंपनी असलेल्या बजाज ऑटो लिमिटेडने या अत्याधुनिक मोटरसायकलींचे उत्पादन केले आहे. ‘डोमिनार ४००’ मोटरसायकली पोलिस कर्मचाऱ्यांना प्रभावी गस्त घालण्यासाठी आणि पुण्यातील विविध शहरी व ग्रामीण भागांमध्ये जलद आपत्कालीन प्रतिसादासाठी खास करुन तयार करण्यात आल्या आहेत.
प्रभावी मजबूत अभियांत्रिकीमुळे डोमिनार ४००’ ही सुसज्ज मोटरसायकल पोलिस अधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आदर्श ठरणार आहे. शक्तिशाली ३७३.३ सीसी लिक्विड-कूल इंजिनमुळे डोमिनार ४००’ ही मोटरसाटकल पोलिसांच्या कर्तव्याच्या आव्हानात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रगत वैशिष्ट्यांसह तयार करण्यात आल्या आहेत.
पुण्यात १९ ते २३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६ या ४३७ कि.मी. अंतराच्या सायकल शर्यतीच्या मार्गावर ‘डोमिनार ४००’ ही मोटरसायकल प्रथम अधिकृतपणे ताफ्याचा भाग बनणार आहेत. त्यानंतर दैनंदिन कायदा अंमलबजावणीच्या कर्तव्यांसाठी तीन पोलिस विभागांना त्या वितरित केल्या जातील.
पुणे पोलीस मैदान, शिवाजीनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय चौबे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या हस्ते ‘डोमिनार ४००’ मोटरसायकल स्वीकारण्यात आल्या. यावेळी उच्च-पदस्थ नागरी अधिकारी विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर, क्रीडा आयुक्त श्रीमती शीतल तेली, जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.
——————————
आधुनिक बनावटीच्या ‘डोमिनार ४००’ मोटरसायकली पोलिस दलात दाखल
Mumbai
haze
26
°
C
26
°
26
°
73 %
2.6kmh
0 %
Fri
26
°
Sat
26
°
Sun
25
°
Mon
25
°
Tue
25
°

