• उपाध्यक्षपदी सौ. वैष्णवी महाडिक यांची निवड
कोल्हापूर :
येथीलल भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी पार पडली. ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यानंतर झालेल्या पदाधिकारी निवडीमध्ये अध्यक्ष म्हणून सौ. अरूंधती धनंजय महाडिक तर उपाध्यक्षा म्हणून सौ. वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून गायत्री साळसकर यांनी काम पाहिले. सन २०२५-३० या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली आहे.
भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी गायत्री साळसकर यांच्या उपस्थितीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये संचालक म्हणून प्राजक्ता घोरपडे, प्रियांका अपराध, संयोगिता नाईक- निंबाळकर, भाग्यश्री शेटके, स्मिता माने, अमर उरूणकर, अर्पिता जाधव आणि सेजल शेंडगे यांची बिनविरोध निवड झाली.
पतसंस्थेचे जाहिरात प्रतिनिधी दिपक साळुंखे यांनी पतसंस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. चॅनेल ‘बी’चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी पतसंस्थेच्या विस्ताराबाबत सुचना केल्या. विजय कळंबकर यांनी आभार मानले. यावेळी सीए शिवराज मगर, पतसंस्थेच्या व्यवस्थापिका निलम नलवडे आदींसह सभासद उपस्थित होते.
दरम्यान, ग्राहकांच्या पाठबळावर पतसंस्था गतीने वाटचाल करत असून, नव्या वर्षात ग्राहकांसाठी अर्थसहाय्य विषयक आणि गुंतवणूकीसाठी आकर्षक योजना सुरू करणार असल्याचे पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. अरूंधती महाडिक यांनी सांगितले.
भागीरथी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक
Mumbai
broken clouds
25.3
°
C
25.3
°
25.3
°
38 %
2.8kmh
64 %
Sun
27
°
Mon
26
°
Tue
26
°
Wed
26
°
Thu
26
°

