कोल्हापूर :
महाराष्ट्र हिंदी परिषदेच्यावतीने हिंदी भाषा, साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील हिंदीच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. माधवी शिवाजीराव जाधव यांना ‘सारस्वत सम्माना’ने गौरविण्यात आले. परिषदेच्या ३२वे अधिवेशनात हा गौरव करण्यात आला.
परिषदेचे अधिवेशन व दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र शनिवारी विवेकानंद कॉलेजमध्ये सुरू झाले. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे माजी कुलगुरु डॉ. इरेश स्वामी यांच्या हस्ते डॉ. माधवी जाधव यांना पुरस्कार राशि, सम्मानपत्र, सम्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र हिंदी परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल काळे, मुख्य सचिव डॉ. गजानन चव्हाण, सोलापूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील माजी विभागप्रमुख प्रो. डॉ. चंद्रदेव कवडे, शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे माजी विभागप्रमुख व ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. वसंत मोरे, शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागाचे माजी प्रमुख डॉ. पी. एस. पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. गजानन चव्हाण, आय.क्यु.ए.सी. समन्व्यक डॉ. श्रुती जोशी, डॉ. पंढरीनाथ पाटील, डॉ. देवीदास बामणे, डॉ. नाजिम शेख, डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. सुरेश शेळके, डॉ. विठ्ठलसिंह ढाकरे यांची उपस्थिती होती.
डॉ. माधवी जाधव यांचा ‘सारस्वत सम्माना’ने गौरव
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
25.3
°
C
25.3
°
25.3
°
38 %
2.8kmh
64 %
Sun
27
°
Mon
26
°
Tue
26
°
Wed
26
°
Thu
26
°

