कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) चे पेट्रन इन् चीफ खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या ७८व्या वाढदिवसाचे औचित्य साधून के.एस.ए.च्या वतीने ६ ते १४ वयोगटातील मुले व मुली यांच्या समवेत एशियन फुटबॉल कॉन्फिडरेशन ग्रासरूट्स डे छत्रपती शाहू स्टेडियमवर बुधवारी सकाळी साजरा करण्यात आला.
फुटबॉल खेळाचा प्रसार व आवड निर्माण होणेसाठी ग्रासरूट्स् डे जगभरात फिफाच्यावतीने साजरा करण्यात येतो. या फेस्टिवलमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र हायस्कूल, छत्रपती शाहू विद्यालय सीबीएसइ व एस.एस.सी., श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल, संजीवन पब्लिक स्कूल, उषाराजे गर्ल्स हायस्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, प्रिन्स शिवाजी इंग्लिश मेडियम स्कूल, भाई माधवराव बागल हायस्कूल, आर.के.नगर अकॅडेमी, एस-३ अकॅडेमी, आर-१२ फुटबॉल अकॅडेमी, चॅम्पियन अकॅडेमी, सेक अकॅडेमी, सिलव्हर व स्वराज्य अकॅडेमी, एस.एस.सॉकर अकॅडेमी, विश्व स्पोर्ट्स् फाऊंडेशन यातील सुमारे ५०० मुले व मुली यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. या फेस्टिवल अंतर्गत छोटी-छोटी मैदान तयार करून फुटबॉल सामने, फन ॲक्टिव्हीटीज्, ड्रिबलिंग, ॲक्युरसी, फिनिशिंग, हेडींग व इतर खेळ घेण्यात आले.
सौ. मधुरिमाराजे छत्रपती व जिल्हा क्रीडाधिकारी सौ. विद्या शिरस यांनी फुटबॉलला किक मारून ग्रासरूट्स् डे चे उदघाटन केले. यावेळी ऑन.जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, जॉ.सेक्रेटरी अमर सासने व सदस्य संभाजीराव पाटील-मांगोरे, विश्वंभर मालेकर, दिपक घोडके, प्रदीप साळोखे तसेच हर्षल नष्टे व अमित गांधी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील निवड झालेले खेळाडू आराध्य चौगुले, आर्यन पोवार, रूद्र स्वामी, साक्षी नावळे व दिव्या गायकवाड तसेच अंतिम निवड चाचणी समितीमध्ये कामकाज केलेले प्रशिक्षक निखील कदम व पृथ्वी गायकवाड यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मालोजीराजे छत्रपती व सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या विशेष मार्गदर्शनानुसार केएसए च्यावतीने शाहू छत्रपती केएसए सब-ज्युनियर फुटबॉल लिग मुले ८, १०, १२ व मुली १२, १४ वयोगटाअंतर्गत लवकरच सुरू करण्यात येत असून त्यांच्या ट्रॉफीचे अनावरण सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांनी केले.
ग्रासरूट्स् डे चे सूत्रसंचालन अमर सासने यांनी केले. ग्रासरूट्स डे मैदानातील विविध उपक्रमांचे नियोजन प्रशिक्षक व ग्रासरूट्स लिडर्स प्रदीप साळोखे, राजेंद्र राऊत, अमित साळोखे, कमलेश मारडिया, गजानन मनगुतकर, योगेश हिरेमठ, अमित शिंत्रे, पृथ्वी गायकवाड, शलाका जामदार, भक्ती बिरनगड्डी, सोनाली साळवी, सानिका पाटील, संजय चिले, सागर चिले, रघू पाटील, गजानन कुऱ्हाडे, निखिल सावंत, श्री. कुंभार, रोहन आडनाईक, ऋषीकेश मेथे-पाटील, अमर सुतार यांनी केले.
खा. शाहू महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त एशियन फुटबॉल कॉन्फिडरेशन ग्रासरूट्स डे साजरा
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
24.8
°
C
24.8
°
24.8
°
61 %
8.3kmh
31 %
Fri
25
°
Sat
25
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
26
°

