• शांकभरी उत्सवांतर्गत निसर्गमित्र परिवाराचा उपक्रम
कोल्हापूर :
पृथ्वीवर आलेल्या दुष्काळात शाकंभरीदेवीने शाक (भाज्या) आणि फळे निर्माण करून सृष्टीला जीवन दिले अशी कथा आहे. आध्यात्म आणि निसर्गाची सांगड घालणाऱ्या शाकंभरीदेवीच्या महोत्सवानिमित्त महिलांनी स्वतः पिकवलेल्या भाज्या बनवून आणाव्यात असे आवाहन करून निसर्गमित्र संस्थेने गतवर्षी बियाणांचे वाटपही केले होते. यातून ३२ महिलांनी प्रत्येकी दोन भाज्या बनवून संस्थेकडे दिल्या. शांकभरी उत्सवांतर्गत देवीला ६४ भाज्यांचा शिधा अर्पण करुन भाविकांनाही याचे वाटप केले. महिलांनी या उपक्रमात सहभाग घेत शिधाचा आस्वाद घेतला.
निसर्ग मित्र परिवार, आदर्श सहेली मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शाकंभरी देवी देवराई संवर्धन उत्सवानिमित्त गतवर्षी नाविण्यपूर्ण परसबाग फुलविण्याबाबत कार्यशाळा घेतली होती. यामध्ये सहभागी महिलांनी आपापल्या परसबागेत या बियाणांचे रोपण केले होते. यातून तनवर्गीय, वेल, वृक्ष, झुडुपवर्गीय आलेल्या केना, काटेमाठ, मांजरी, गुळवेल, कांडवेल, कोहळा, शेवगा, उंबर, करंज, म्हाळूंग, लिंबू, गोकर्ण, आळू, मोहरी, ओवा, हरभरा, कांदापात, टोमॅटो, शेपू, गवारी, पालक, दूधी, रताळे, माईनमूळा यापासून बनवलेले पदार्थ महोत्सवासाठी आणले होते. भाजी, वडी, लोणचे, चटणी व फळे अशा स्वरूपात शिधा होता. आरोग्यवर्धक अशा गावरान भाज्यांचा सर्वांनी आहारात नियमित वापर करावा असे आवाहन निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी उत्सवाच्या निमित्ताने केले.
मंदिरामध्ये देवीला शिधा अर्पण केल्यानंतर परिसरातच निसर्गप्रेमी भाविकांनी या शिधाचा आस्वाद घेतला. चंदगडहून दीपक पाटील, शाहूवाडीहून शेखर सुतार, मोहन माने, सूरज पाटील, सोहम हळदकर यांनी भाज्या पाठवून देत संस्थेला सहकार्य केले. शिधा अर्पण करतेवेळी हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर, उदय भोसले, संतोष तावडे, उमेश कोडोलीकर, शिवानी कोडोलीकर, राजश्री पाटील, राणिता चौगुले यांनी सहभाग घेतला.
——————————
परसबागेत फुलवलेल्या ६४ भाज्या शाकंभरी देवीच्या चरणी
Mumbai
scattered clouds
24.8
°
C
24.8
°
24.8
°
61 %
8.3kmh
31 %
Fri
25
°
Sat
25
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
26
°

