Homeराजकियकोल्हापूरच्या विकासासाठी महायुतीच सक्षम : आ. राजेश क्षीरसागर

कोल्हापूरच्या विकासासाठी महायुतीच सक्षम : आ. राजेश क्षीरसागर

कोल्हापूर :
निवडणूक आली कि आमदार सतेज पाटील कोणती ना कोणती टॅग लाईन काढून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करतात. पण नुसत्या टॅग लाईन काढून कोल्हापूरचा विकास होणार नाही. कोल्हापूरचा विकास करायला महायुती सक्षम आहे. त्याचमुळे महायुतीच्या वाढत्या प्रभावाने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी शिवसेना उपनेत्या माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण आदी उपस्थित होते.
शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले कि, सतेज पाटील यांनी २००५ पासून सत्तेत असल्याचे कबूल केले. हे करत असताना मात्र त्यांनी स्वतःच्या अपयशाचे खापर मात्र नेहमीप्रमाणे दुसऱ्यांवर फोडण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत मी आमदार नसताना देखील कोट्यावधी रुपयांचा निधी आणला.
आ. क्षीरसागर म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यासह शहराचा विचार करता पूरनियंत्रण प्रकल्प, कन्व्हेन्शन सेंटर, सर्किट बेंच, श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, आय.टी. पार्क मंजुरी, अमृत २.० योजेनेतून मलनिस्सारण प्रकल्प, १०० कोटींचे रस्ते असे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्याचमुळे महायुतीचा पारदर्शी कारभार आ. सतेज पाटील यांच्या डोळ्यात खुपत आहे. गेले २० वर्षे सत्तेत असताना आ. सतेज पाटील यांना शहरातील रस्ते, पार्किंग व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, उद्यान बागांचे सुशोभिकरण का दिसले नाही किंवा त्यांनी यावर उपाययोजना का केल्या नाहीत? याचाही पंचनामा त्यांनी जनतेसमोर मांडणे गरजेचे आहे.
गेल्या गणेशोत्सवात आ.सतेज पाटील यांच्या अभ्यंगस्नानांची थेट पाईपलाईन बंद पडली. शहरातील माता – भगिनी पाण्यासाठी रस्त्यावर उतरत होत्या. त्यावेळी हे महाशय कुठे गायब होते? पण, शिवसेनेने तातडीने पाणी पुरवठ्याची पर्यायी यंत्रणा सुरु करून पाणीपुरवठा सुरळीत केला. एवढ्यावर न थांबता पर्यायी यंत्रणा सक्षम अभावी यासाठी निधी दिला, हे महायुतीचे काम आहे. गेले अनेक वर्षे कोल्हापूर महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचारी न्यायच्या प्रतीक्षेत होते. तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे काम आम्ही केले. यासह के.एम.टी. मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही सेवेत कायम करण्याचे काम शिवसेना महायुतीचेच आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले कि, १५ जानेवारी बाबत आमदार सतेज पाटील यांनी नवी टॅग लाईन काढली असल्याचे समजते. पण, कोल्हापूर महानगरपालिकेचा विकास करण्यासाठी, शहरवासियांना हक्काच्या सुविधा पुरविण्यासाठी महायुती सक्षम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच विकासाचे व्हिजन ठेवून कामकाज करत आहे. याची निश्चितच जाणीव मतदारांना असल्याने ते महायुतीच्या पाठीशी सक्षमपणे उभे आहेत. त्यामुळे आता जनतेनेच ठरवले आहे ‘१५ जानेवारी… महायुतीचा भगवाधारी’. त्यांनी कितीही टॅग लाईन काढाव्यात पण जतना त्यांच्या भूलथापाना बळी पडणार नाही.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
24.8 ° C
24.8 °
24.8 °
61 %
8.3kmh
31 %
Fri
25 °
Sat
25 °
Sun
27 °
Mon
27 °
Tue
26 °

Most Popular

You cannot copy content of this page