कोल्हापूर :
महाराष्ट्र अंडर-१९ महिला क्रिकेट संघाने शानदार सांघिक कामगिरी करत बीसीसीआय महिला अंडर-१९ एकदिवसीय ट्रॉफी २०२५-२६चे विजेतेपद पटकावले. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने गुजरात संघावर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाने २२३ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. गुजरातकडून दिया वर्धनी हिने ८१ धावांची उत्कृष्ट खेळी केली, तर चार्ली सोलंकी हिने ५६ धावांचे योगदान दिले. मात्र महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी निर्णायक टप्प्यावर भेदक मारा केला. ग्रिशा कटारियाने चार गडी बाद करत गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व केले, तर प्रेर्णा सावंत हिने तीन महत्त्वपूर्ण बळी घेत गुजरात संघाला नियंत्रित धावसंख्येपर्यंत रोखण्यात मोलाची भूमिका बजावली.
या लक्ष्याचा पाठलाग करताना महाराष्ट्र संघाने अत्यंत संयमी आणि आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी सादर केली. ३९.४ षटकांत केवळ तीन गडी गमावत महाराष्ट्राने २२६ धावा करत विजय मिळवला. जिया सिंग हिने ५७ तर अक्षया जाधव हिने नाबाद ५४ धावा करत डाव सांभाळला. भाविका अहिरे हिने नाबाद ४६ धावांची खेळी करत महाराष्ट्राच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन करताना रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्र अंडर-१९ महिला संघाचे अभिनंदन. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत विजेतेपद मिळवले. सीनियर महिला संघानंतर आता अंडर-१९ महिला संघानेही राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद पटकावणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील महिला क्रिकेट नवनवीन उंची गाठत असून राज्यातील महिला क्रिकेटसाठी हे सुवर्णकाळाचे संकेत आहेत. सर्व खेळाडू, त्यांचे पालक, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ व निवड समितीचे विशेष अभिनंदन. हा विजय महाराष्ट्र क्रिकेटसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो भविष्यातील युवा क्रिकेट प्रतिभेसाठी तो प्रेरणादायी ठरेल.
——————————
महाराष्ट्र अंडर-१९ महिला संघ विजेता
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
25.2
°
C
25.2
°
25.2
°
62 %
5.2kmh
0 %
Sun
25
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
26
°
Thu
26
°

