कोल्हापूर :
संजय घोडावत विद्यापीठ येथे नुकतीच ‘विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीपणे पार पडली. या परिषदेला देशातील संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
परिषदेचे मुख्य वक्ते भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबईचे प्रख्यात तज्ज्ञ डॉ. सीबी राज बी. पल्लई हे होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून आधुनिक तंत्रज्ञानातील नव्या घडामोडी, संशोधनातील उदयोन्मुख प्रवाह तसेच उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील परस्पर सहकार्याच्या संधी यावर सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते. परिषदेसाठी १०१ रिसर्च पेपर प्राप्त झाले.त्यापैकी ५७ पेपरची तज्ञांकडून समालोचन करून सादरीकरणासाठी निवड झाली. पुढील पिढीतील संगणकीय जाळे व सेमीकंडक्टर तंत्रज्ञान, बुद्धिमान संगणन प्रणाली, डेटा सायन्स व सायबर सुरक्षा, रोबोटिक्स, स्वयंचलन आणि ड्रोन तंत्रज्ञान, मल्टिमीडिया सिग्नल प्रोसेसिंग या विषयांवर चर्चा करण्यात आली.
परिषदेचे संयोजन प्रा. डॉ. शामला महाडिक यांनी केले. आयोजन समितीत प्रा. डॉ. स्वप्निल हिरीकुडे, प्रा. डॉ. दीपिका पाटील, प्रा. डॉ. चेतन आरगे, प्रा. गुरुनाथ मच्छले, प्रा. समीर तांबोळी, प्रा. अमरीश पाटील व प्रा.स्वाती पाटील यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्वाती पाटील, सूत्रसंचालन प्रा. गुरुनाथ मच्छले, प्रा. ईश्वरी भोसले, प्रा. सृष्टी पाटील यांनी तर आभार प्रा. अमरीश पाटील, प्रा. समीर तांबोळी यांनी मानले. या आंतरराष्ट्रीय परिषदेस संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले
घोडावत विद्यापीठात ‘विकसित भारतासाठी तंत्रज्ञानांचा संगम’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
24.7
°
C
24.7
°
24.7
°
49 %
2.8kmh
0 %
Mon
27
°
Tue
26
°
Wed
26
°
Thu
26
°
Fri
26
°

