•“कलादर्पण: सोहळा संस्कृतीचा” या सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता
कोल्हापूर :
पोदार इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे २१ ते २३ डिसेंबर या कालावधीत १४वे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या तीनदिवसीय कार्यक्रमाची सांगता पोदार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या “कलादर्पण: सोहळा संस्कृतीचा” या संकल्पनेवर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली. या स्नेहसंमेलनात तब्बल ५६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी दोन आठवडे कठोर सराव करून आपली कला सादर केली.
स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी पोदार प्रेप स्कूलचा “जम्बोसोबत सूर आणि साजचा संगम” या विशेष विषयावर आधारित या कार्यक्रमात भारतातील विविध राज्यांतील पारंपरिक वाद्यांची आणि त्यांच्या सुरांची ओळख मुलांनी एका संगीतमय प्रवासातून करून दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संगीत अलंकार आणि लॅण्डस्केप आर्टिस्ट गिरीधर कुलकर्णी हे होते.
दुसऱ्या दिवशी पोदार प्रायमरी स्कूलचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. यावर्षीचा सांस्कृतिक कार्यक्रम “स्टोरीक्विल्ट एव्हरी स्टिच टेल्स अ टेल” या संकल्पनेवर आधारित असून, जीवनातील मूल्ये, अनुभव आणि अर्थपूर्ण क्षण यांचे सुंदर दर्शन घडवण्यात आले. हे सादरीकरण समाजसेविका श्रीमती सुधा मूर्ती यांना समर्पित होते. यावेळी प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रशांत तानाजी पाटील तसेच विशेष पाहुणे कर्नल (डॉ.) राम आठवले आणि त्यांच्या पत्नी सौ. मंजुषा आठवले यांची उपस्थिती होती.
“कलादर्पण: सोहळा संस्कृतीचा” या सोहळ्यात महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे आणि कालातीत परंपरांचे दर्शन घडविण्यात आले. संगीत, नृत्य, नाट्य, भक्तीभाव आणि कथाकथनाच्या माध्यमातून संतांची शिकवण, वीरांची शौर्यगाथा, कलावंतांची सर्जनशीलता आणि सामान्य जनजीवनाचे सौंदर्य प्रभावीपणे सादर करण्यात आले. महाराष्ट्राची संस्कृती ही केवळ इतिहास नाही, तर ती आजही जिवंत आहे, हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.
कार्यक्रमात १०० विद्यार्थ्यांच्या वाद्यवृंदाने (स्टुडंट ऑर्केस्ट्रा) सादर केलेल्या सुरेल संगीताने उपस्थितांची मने जिंकली. महाराष्ट्राच्या लोकसंगीत, भक्तीपर परंपरा आणि उत्सवी वातावरणाचे प्रतिबिंब या सादरीकरणातून अनुभवायला मिळाले. या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून पोलीस उपअधीक्षक सौ. सुवर्णा पत्की यांची उपस्थिती लाभली.
मुख्य अतिथींनी आपल्या भाषणातून शाळेच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीचे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे आणि सांस्कृतिक मूल्यजपणुकीचे विशेष कौतुक केले. त्यानंतर प्राचार्या सौ. शिल्पा कपूर यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर करताना गेल्या वर्षातील शैक्षणिक व सहशैक्षणिक यशाचा आढावा घेतला.
पोदार इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29.8
°
C
29.8
°
29.8
°
53 %
7.4kmh
3 %
Wed
30
°
Thu
30
°
Fri
30
°
Sat
29
°
Sun
29
°

