कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने मंगळवारी शासकीय धान्य गोदाम येथील मतमोजणी केंद्राची जिल्हाधिकारी अमोल येडगे व प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी संयुक्तपणे पाहणी केली. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेनंतर पार पडणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी १४ भरारी पथके, ३९ स्थिर पथके तसेच ७ व्हिडीओ पडताळणी पथके नियुक्त करण्यात आली असून त्यांचे कामकाज सुरू झाले आहे. मंगळवार दि.२३ पासून नामनिर्देशन पत्रांची विक्री तसेच नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी शहरात एकूण ५८४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
मतमोजणी प्रक्रिया शासकीय धान्य गोदाम येथे पाच निवडणूक निर्णय अधिकारी तसेच राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील हॉल येथे दोन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात पार पडणार आहे. शहरात एकूण ४,९४,७११ मतदार असून त्यामध्ये २,४४,७३४ पुरुष मतदार तर २,४९,९४० महिला मतदार तसेच ३७ इतर मतदारांचा समावेश आहे.
मतमोजणी केंद्राच्या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्ट्राँग रूम व मतमोजणी कक्षासाठी आवश्यक सुरक्षितता उपाययोजना, अंतर्गत रचना व व्यवस्थापनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या. प्रभागनिहाय मतमोजणीची व्यवस्था, टेबल मांडणी, मनुष्यबळ नियोजन तसेच अधिकारी व उमेदवार प्रतिनिधींसाठी बैठक व्यवस्थेचा यावेळी आढावा घेण्यात आला. त्यानंतर राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील सभागृहात उभारण्यात येणाऱ्या स्ट्राँग रूम व मतमोजणी कक्षाचीही पाहणी करण्यात आली. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व वेळेत पार पडावी, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) स्वाती गायकवाड, उपआयुक्त परितोष कंकाळ, तहसीलदार स्वप्निल पोवार, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पोवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, मुख्य जयवंत पोवार, सहाय्यक विद्युत अभियंता अमित दळवी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
——————————
मतमोजणी केंद्रांची जिल्हाधिकारी अमोल येडगे व प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी
Mumbai
few clouds
22.8
°
C
22.8
°
22.8
°
42 %
3.9kmh
16 %
Sat
25
°
Sun
27
°
Mon
26
°
Tue
26
°
Wed
26
°

