• दिलबहार आणि संध्यामठ पराभूत
कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ अ आणि ब संघाने आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात केली. चौथ्या फेरीत पाटाकडील (अ)ने तीन विजय व एका बरोबरीसह एकूण १० गुण प्राप्त केले आहेत. पाटाकडील (ब)ने पहिला विजय मिळवून तीन गुणांसह खाते उघडले. संध्यामठ तरुण मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांना अद्याप गुणांचे खाते उघडता आलेले नाही.
छत्रपती शाहू स्टेडियमवर दुपारच्या सत्रात पाटाकडील (अ) आणि दिलबहार यांच्यातील सामना एकतर्फी झाला. पूर्वार्धात पाटाकडील (अ) कडून झालेल्या चढाईत मोठ्या डी बाहेरून मारलेल्या जोरदार फटक्यावर ओमकार मोरेने पहिला गोल नोंदविला. १७व्या मिनिटास मिळालेल्या १-० गोलच्या आघाडीनंतर ऋषिकेश मेथे-पाटील, ओमकार मोरे, प्रथमेश हेरेकर, दिग्विजय बसगरे, नबी खान यांनी वेगवान चाली रचल्या पण ते गोलची आघाडी वाढवू शकले नाहीत. दिलबहारच्या फेबिन गिब्सचा फटका गोलरक्षक अमर गवळीने तितक्याच तत्परतेने परतावून लावत गोलचे संकट टाळले. प्रथम भोसले, स्वयंम साळोखे, गंधर्व घाटगे, सार्थक मगदूम यांनी केलेल्या चढाया समन्वाचा अभाव आणि दिशाहीन फटाक्यांमुळे वाया गेल्या.
उत्तरार्धात पाटाकडीलच्या ओमकार मोरेने वैयक्तिक तसेच संघाचा दुसरा गोल ४५ व्या मिनिटाला नोंदवून आघाडी २-० अशी वाढवली. त्यानंतर ५८व्या मिनिटास यश देवणे याने उत्कृष्ट गोल नोंदवत आघाडी ३-० अशी भक्कम केली. दिलबहारकडून आघाडी कमी करण्यासाठी खोलवर चढाया झाल्या पण त्यांना अखेरपर्यंत यश मिळाले नाही. ३-० ढोलची आघाडी राखतच पाटाकडील (अ)ने विजयावर शिक्कामोर्तब केले.
पाटाकडील (ब)चा पहिला विजय…
दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात पाटाकडील (ब)ने पहिला विजय मिळवून गुणांचे खाते उघडले. पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. उत्तरार्धात रोहनकुमार कांबळेने गोल नोंदवून ६०व्या मिनिटास महत्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्यानंतर यश मुळीकने ७५ व्या मिनिटाला गोल करून आघाडी २-० अशी केली. संध्यामठकडून सुलतान शेख, अभिजीत साळोखे, जॉन पॉल यांनी केलेल्या चढायांना यश आले नाही. पाटाकडील (ब)च्या गुरुराज काटकर, युनूस पठाण, सार्थक राऊत यांनी गोलची आघाडी वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर उर्वरित वेळेत २-० गोलची आघाडी कायम राखत पाटाकडील (ब)ने पहिला विजय साकारला.
——————————
• झुंजार क्लब – प्रॅक्टीस : दु.१:३० वा.
• खंडोबा – वेताळमाळ : दु. ४ वाजता
——————————
पाटाकडील अ आणि ब संघाचा विजयी धमाका
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
38 %
5.1kmh
20 %
Sun
27
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

