कोल्हापूर :
डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन संशोधन उत्सव ‘आविष्कार-२०२५’ स्पर्धेत तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यातील तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यपीठाच्या अंतर्गत एकूण ३७ महाविद्यालयातील २२७ विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील बी. टेक. ऍग्रीचे ११ व डॉ. डी. वाय. पाटील बी. एससी. ऍग्रीचे ७ विद्यार्थी सहभागी झाले होते. सहा प्रवर्गातून १८ स्पर्धक विजेते म्हणून घोषित करण्यात आले असून हे १८ जण राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.
या १८ विजेत्यांमध्ये मेडिसिन अँड फार्मसी या प्रवर्गामधून अदिती पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच ह्युमॅनिटीज लैंग्वेज अँड फाईन आर्ट्स या प्रवर्गामधून श्रावणी देशमुख हिने द्वितीय क्रमांक व शंकर परीटने तृतीय क्रमांक मिळवला.
मार्गदर्शक व समन्वयक म्हणून प्रा. एस. बी. माळी व डॉ. वाय. व्ही. पाटील यांनी काम पाहिले. बी. टेक. ऍग्रीचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, बी. एससी. ऍग्रीचे प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार, प्रा. ए. बी. गाताडे व प्रा. पी. डी. उके यांचे प्रोत्साहन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
——————————
डॉ. डी. वाय. पाटील ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांचे यश
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
32
°
C
32
°
30.9
°
37 %
8.2kmh
3 %
Sat
32
°
Sun
29
°
Mon
31
°
Tue
30
°
Wed
29
°

