Homeराजकियमाजी नगरसेवक विनय फाळके यांच्या प्रचाराचा शुभारंभ

माजी नगरसेवक विनय फाळके यांच्या प्रचाराचा शुभारंभ

कोल्हापूर :
माजी नगरसेवक विनय उर्फ विनायक विलासराव फाळके हे कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक लढवित आहेत. प्रभाग क्रमांक १४ मधून विनय विलासराव फाळके कॉग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी (दि.१८) सकाळी दिलबहार तालीम मंडळ येथील श्री साईबाबा मंदीर येथून झाला. श्री साईबाबा यांचे दर्शन घेऊन विनय फाळके यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रभागातून पायी प्रचार रॅली काढली.
माजी नगरसेवक विनय फाळके यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभागातील जेष्ठ नागरिकांनी नारळ फोडून केला. त्यानंतर प्रचार रॅलीप्रसंगी उमेदवार विनय फाळके हे प्रभागातील नागरिकांना भेटले. काही ठिकाणी विनय फाळके यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी मतदारसंघातील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रचार शुभारंभ रॅलीमध्ये  कार्यकर्ते, महिलावर्ग व भागातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
33 ° C
33 °
33 °
40 %
6.7kmh
0 %
Sat
33 °
Sun
30 °
Mon
31 °
Tue
29 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page