Homeसामाजिकमहापालिका कर्मचाऱ्यांच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीस ५० हजार शेणी

महापालिका कर्मचाऱ्यांच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीस ५० हजार शेणी

कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ५३व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांच्यावतीने ५० हजार शेणी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या. पंचगंगा स्मशानभूमीस महापालिकेचे कर्मचारी दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त शेणी देतात. महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात या शेणी प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.
महापालिका कर्मचाऱ्याकडून गेली १३ वर्षे पंचगंगा स्मशानभूमीस शेणी प्रदान करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रथम वर्षी १० हजार शेणी, दुसऱ्या वर्षी २० हजार शेणी, तिसऱ्या वर्षी ३० हजार, फायर एक्स्टयुगेशर व भिंतीवरील मोठे घडयाळ व चौथ्या वर्षी ३० हजार शेणी, पाचव्या वर्षी ३५ हजार व सहाव्या वर्षी ४० हजार, सातव्या वर्षी ४० हजार शेणी, नवव्या वर्षी ३५ हजार, दहाव्यावर्षी ५१ हजार, अकराव्या वर्षी ५२ हजार, बाराव्या वर्षी ५१ हजार व यावर्षीही ५० हजार शेणी सुपूर्द करण्यात आल्या.
यावेळी उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त स्वाती दुधाने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील व महापालिकेचे कर्मचारी संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31 ° C
31 °
31 °
35 %
4.6kmh
0 %
Sat
31 °
Sun
30 °
Mon
31 °
Tue
29 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page