Homeराजकियकाँग्रेस पक्षाची इंडिया आघाडीबरोबर चर्चा

काँग्रेस पक्षाची इंडिया आघाडीबरोबर चर्चा

कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून लढण्यासाठी चर्चेची प्राथमिक फेरी शनिवारी झाली. यात काँग्रेसने नेमलेल्या समितीने सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. त्यानंतर इंडिया आघाडीतील भाकप, माकप, आप व शेकापच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात आली.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक एकसंघपणे लढण्यासाठी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकत घटक पक्षांशी चर्चा करण्यासाठी समिती नेमली आहे. ही समिती शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व इंडिया आघाडीतील इतर पक्षांशी १३ ते १६ डिसेंबर या कालावधीत चर्चा करून त्याचा अहवाल १७ डिसेंबरला काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना देणार आहे. यानुसार या समितीने शनिवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाबरोबर चर्चा केली.
काँग्रेस पक्षाच्यावतीने आनंद माने, सचिन चव्हाण, राजू लाटकर, विक्रम जरग, तौफिक मुल्लाणी, भारती पोवार, भरत रसाळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आर. के. पोवार, सुनील देसाई, गणेश नलावडे, पद्मजा तिवले, भाकपचे दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, माकपचे उदय नारकर, शेकापचे बाबुराव कदम, आम आदमीचे उत्तम पाटील, अभिजीत कांबळे, मोईन मोकाशी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26 ° C
26 °
26 °
47 %
2.6kmh
0 %
Sat
26 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
29 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page