कोल्हापूर :
शालेय कबड्डी स्पर्धेत अटीतटीने खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मध्यंतरापर्यंत पुणे विभागाने नाममात्र ४ गुणांची आघाडी घेतली होती. साताऱ्याच्या भार्गवीने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला पण ती संघाची पराभव टाळू शकली नाही. अखेर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुणे विभागाने सातारा संघाचा अजिंक्यपद ५० विरूध्द ४५ गुणफरकाने पराभव करून अजिंक्यपद पटकावले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने शुक्रवारी ही स्पर्धा शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील बिरदेव मंदिर परिसरात झाली. स्पर्धेचे उदघाटन आमदार अमल महाडिक, शिरोली गावच्या सरपंच पद्मजा करपे, एनएस कोच दीपक पाटील, आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश शिंदे, शिवछत्रपती विजेत्या सायली केरीपाळे यांच्या उपस्थितीत झाले.
स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना कोल्हापूर विभाग विरुद्ध मुंबई विभाग यांच्यात झाला. यात कोल्हापूर विभागाने मुंबई विभागावर ५३-३९ असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीत पुणे विभागाने अमरावती विभागाचा २४-२१ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत पुणे संघाने कोल्हापूर संघाचा ५०-४५ असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. तृतीय क्रमांकाच्या सामन्यात अमरावती विभागाने मुंबई संघाचा २२ गुणांनी पराभव केला.
बक्षीस समारंभ क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच विजय जाधव यांच्या हस्ते झाला. पंच म्हणून प्रा. कुबेर पाटील, दत्तात्रय पाटील, शिवाजी मगदूम, अमर शिंदे, शैलेश पाटील, गजानन पाटील, संजय हवालदार, तुषार जगताप, अमर भिसे आदींनी काम पाहिले. संयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, स्पर्धा प्रमुख क्रीडा अधिकारी अरुण पाटील, क्रीडा अधिकारी मनीषा पाटील, सुधाकर जमादार व सहकाऱ्यांनी केले.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी संदीप जाधव, गौरव खामकर, अजिंक्य चौगुले, सीमा पाटील, सोनल सावंत, अनिकेत बोडके, विकास दळवी, महेश गावडे आदींनी यशस्वी नियोजन केले.
——————————
राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत पुणे विभागाला अजिंक्यपद
RELATED ARTICLES
Mumbai
haze
24
°
C
24
°
24
°
69 %
3.6kmh
0 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°
Fri
26
°

