कोल्हापूर :
अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार’ मेजर स्वाती संतोष महाडिक यांना देण्यात येणार आहे. बुधवारी (दि.१०) सकाळी ११ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होईल, अशी माहिती मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुळीक म्हणाले, ‘स्वराज्यरक्षिका, करवीर राज्य संस्थापिका महाराणी ताराबाई यांच्या ३५०व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या महापराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी विविध उपक्रम होत आहेत. त्या अनुषंगाने यंदा मेजर स्वाती महाडिक यांना पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांचे पती कर्नल संतोष महाडिक जम्मू काश्मीर येथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले असून, त्यांच्या शौर्याचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी मेजर स्वाती महाडिक सैन्य दलात भरती झाल्या आहेत. महाराणी ताराबाई यांच्या संघर्षमय जीवनाप्रमाणे त्यांनी आयुष्याची दिशा स्वीकारली आहे. त्यांचा आदर्श युवा पिढीने घ्यावा, यासाठी पुरस्कार देण्यात येत आहे.
ते पुढे म्हणाले की, मेजर जनरल काशीद व जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, कर्नल अमरसिंह सावंत, कर्नल विक्रम नलावडे, शिवाजीराव परुळेकर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचे ‘महाराणी ताराबाई : एक अभ्यास’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
पत्रकार परिषदेस शैलजा भोसले, सी. एम. गायकवाड, चंद्रकांत चव्हाण, उदय देसाई, बबनराव रानगे, एम. डी. देसाई, प्रकाश पाटील, विजय पाटील, शरद साळुंखे, कादर मलबारी, संजय कांबळे, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.
——————————
मोगलमर्दिनी ताराराणी पुरस्कार मेजर स्वाती महाडिक यांना जाहीर
Mumbai
smoke
27
°
C
27
°
25.9
°
41 %
4.1kmh
20 %
Sun
28
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

