कोल्हापूर :
येथील विवेकानंद ज्युनिअर कॉलेज आर्ट्स-कॉमर्स विभागामार्फत शैक्षणिक अभ्यासानिमित्त भोगावती सहकारी साखर कारखाना, परिते (ता. करवीर) येथे अभ्यास भेट आयोजित करण्यात आली. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिनाचे औचित्य साधून ही अभ्यास भेट झाली.
विद्यार्थ्यांना साखर निर्मिती प्रक्रिया, सहकारी उद्योग व्यवस्थापन, आर्थिक व्यवहार ज्ञान तसेच प्रदूषण नियंत्रण पद्धती यांची प्रत्यक्ष अनुभूती देणे या हेतूने या शैक्षणिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेजमधील इयत्ता १२वी कॉमर्स वर्गातील ५१ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
कारखाना व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना साखर निर्मिती प्रक्रियेतील सर्व विभागांना भेट घडवून सर्व इत्यंभूत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे समाधानही केले. विद्यार्थ्यांनी सर्व बारकावे समजावून घेत त्याच्या नोंदी घेतल्या. येथील सर्व व्यवस्थापकीय पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांची रचना व कार्ये या बाबी समजून घेत आर्थिक व्यवहार पद्धती, व्यापार, संपर्क इत्यादीबाबत प्रत्यक्ष अनुभव घेतला.
२ डिसेंबर हा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून कारखान्यांमधील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (इटीपी) विभागासही विद्यार्थ्यांनी यावेळी भेट दिली. कारखान्यातील प्रदुषित होणारे पाणी या विभागामध्ये प्रक्रिया करून पुन्हा शुद्धीकरण करून पुनर्वापर केला जातो. येथील होणाऱ्या प्रक्रियांची शास्त्रीय माहिती पर्यावरण शिक्षक अनिल धस यांनी विद्यार्थ्यांना दिली.
या उपक्रमाचे आयोजन विभागप्रमुख प्रा. सौ. शिल्पा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपक्रम भेटीसाठी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन एस. ए. पाटील यांनी परवानगी देऊन मोलाचे सहकार्य केले. व्यवस्थापकीय संचालक एस. बी. पाटील, अधिक्षक एन. बी. जाधव यांनीही आवश्यक सर्व मार्गदर्शन केले.
उपक्रमास महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रजिस्ट्रार एस. के. धनवडे यांनी सहकार्य केले. पी. वाय. राठोड यांनी आयोजन नियोजन केले. प्रा. सौ. एस. एन. ढगे, प्रा. सौ. पी. पी. पडेलकर, ए. आर. धस यांनी सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करण्यामध्ये मोलाचे सहकार्य केले. स्टाफ सेक्रेटरी बी. एस. कोळी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही विशेष सहकार्य लाभले.
——————————
विवेकानंदच्या विद्यार्थ्यांची भोगावती साखर कारखान्यास अभ्यास भेट
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
29.9
°
45 %
3.1kmh
0 %
Sun
29
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

