कोल्हापूर :
एशियन फुटबॉल फेडरेशन (एएफसी) च्या एलिट यूथ स्कीम अंतर्गत कंबोडिया, भूतान आणि लेबनॉन या देशांच्या एलिट यूथ डेव्हलपमेंट रचनेचे मूल्यांकन करण्यासाठी एएफसीच्या युवा पॅनेलवरील प्रमुख सदस्य म्हणून अंजू तुरंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून आशियातील फुटबॉल खेळणाऱ्या देशांमध्ये सक्षम, शाश्वत आणि सर्वांगीण युवक फुटबॉल विकास व्यवस्था निर्माण करण्यासाठी एएफसी प्रयत्नशील आहे. या पॅनेलवरील भारतातून एकमेव सदस्य असलेल्या अंजू यांनी त्यांचे सहकारी जीहून किम (कोरिया) – लेबनॉन, ताकेशी ओनो (जपान) – कंबोडिया व विथया लाखाकुल (थायलंड) – भूतान यांच्यासह मूल्यांकनकर्त्यांसह ऑफलाइन मूल्यांकन प्रक्रियेची सुरुवात केली आहे.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात त्या कंबोडिया आणि भूतानमध्ये ऑन-साइट मूल्यांकनासाठी भेट देत आहेत. या भेटींमध्ये प्रत्येक देशाच्या युवक विकास कार्यक्रमाला मजबुती देण्यासाठी सखोल ऑन-फील्ड निरीक्षणे आणि मूल्यांकनांचा समावेश आहे. या प्रक्रियेदरम्यान त्या प्रत्येक फुटबॉल फेडरेशनच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधून विद्यमान व्यवस्था, त्यातील आव्हाने आणि भविष्यातील विकास दिशा यांचा सखोल अभ्यास करतील.
—————
फुटबॉल विकासासाठी योगदान देणे हेच माझे ध्येय…
या जबाबदारीबद्दल बोलताना अंजू म्हणाल्या की, एएफसीने माझ्यावर ठेवलेला विश्वास माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. आशियातील सर्वांगीण फुटबॉल विकासासाठी अर्थपूर्ण योगदान देणे हेच माझे ध्येय आहे. विविध देशांतील सहकाऱ्यांसोबत काम करणे ही माझ्यासाठी मोठी संधी आणि आशीर्वाद आहे. माझे अनुभव आणि ज्ञान शेअर करून मी प्रत्येक देशाला शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.
——————————————————-
कंबोडिया, भूतान आणि लेबनॉन देशाच्या फुटबॉल मूल्यांकनासाठी अंजू तुरंबेकर यांची नियुक्ती
RELATED ARTICLES
Mumbai
haze
27
°
C
27
°
27
°
61 %
0kmh
0 %
Sun
27
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

