कोल्हापूर :
जयपूर (राजस्थान) येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स- २०२५ मध्ये शिवाजी विद्यापीठाला गुरुवारी शूटिंगमध्ये कांस्यपदक तसेच आर्चरीत रौप्यपदक प्राप्त झाले.
शिवाजी विद्यापीठाचे खेळाडू रणवीर अजितसिंह काटकर (डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, कोल्हापूर), अथर्व गंगाराम पाटील (डी. वाय. पाटील इंजिनियरिंग कॉलेज, कोल्हापूर), प्रतीक आनंदा जोंग (नाईट कॉलेज, कोल्हापूर) यांनी १० मीटर एअर रायफल टीम या प्रकारात १८६८.८ इतक्या गुणांसह कांस्य पदक पटकावले.
तिरंदाजीतही (आर्चरी) शिवाजी विद्यापीठाच्या साहिल शेलार याने रौप्यपदक प्राप्त केले. साहीलने या पदकासोबतच रिकव्हर (पुरुष) या आर्चरी खेळ प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याला प्रशिक्षक डॉ. समीर पवार, शिवाजी दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या खेळाडूंना शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यापीठ पथकप्रमुख डॉ. एन. डी. पाटील यांचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षक डॉ. धनंजय पाटील, सचिन जाधव, शिवाजी दाभाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————————————-
खेलो इंडियात शिवाजी विद्यापीठाला शूटिंगमध्ये कांस्य तर आर्चरीत रौप्यपदक
RELATED ARTICLES
Mumbai
haze
27
°
C
27
°
27
°
65 %
2.6kmh
0 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
27
°
Tue
26
°

