Homeराजकियकोल्हापूर भाजपकडून संविधान दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर भाजपकडून संविधान दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर :
भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक बिंदू चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी संविधान प्रतिमेचे पूजन देखील करण्यात आले. संविधानाचे सामूहिक वाचन करून लोकशाहीच्या पायाभूत तत्त्वांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी, भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नसून ते देशाच्या आत्मा आणि लोकशाहीचे प्रतीक असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्राला अनुसरून भाजप पक्ष संविधानाने घालून दिलेल्या मार्गावर चालत असल्याचे त्यांनी नमूद केले. सुशासन, पारदर्शकता आणि प्रत्येक नागरिकाच्या विकासासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंग राहुल चिकोडे, विराज चिखलीकर, अमर साठे, धनश्री तोडकर, माधुरी नकाते, रूपाराणी निकम, भरत काळे, हेमंत आराध्ये, विजय अग्रवाल, गणेश देसाई, अतुल चव्हाण, दीपक काटकर, रोहित पोवार, मंगला निपाणीकर, राजसिंह शेळके, छाया साळुंखे, अश्विनी गोपुडगे, तेजस्विनी पार्टे, स्वाती कदम, किरण नकाते, भूषण कानकेकर, संग्राम निंबाळकर आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
Mumbai
haze
27 ° C
27 °
27 °
65 %
2.6kmh
0 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
27 °
Tue
26 °

Most Popular

You cannot copy content of this page