कोल्हापूर :
मार्शल आर्ट खेळातील २५ वर्षाहून अधिक आणि महिलांसाठी घेतलेल्या सेल्फ डिफेन्स कार्यशाळा तसेच, पर्यावरण, शैक्षणिक, सामाजिक कार्याची दखल घेऊन सतिश महादेव वडणगेकर यांना साऊ ज्योती सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्यावतीने राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले.
साऊ ज्योती सामाजिक संस्था महाराष्ट्र यांचा रविवारी (दि.१६) भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे येथे राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष साई इंडियन ट्रस्ट असो. न्यू दिल्ली अध्यक्ष ऐलिट चेंबर कॉमर्स इंडस्ट्रीचे प्रा. डॉ. शंकर अंदानी होते. यावेळी पोलीस उपनिरिक्षक, पूनम पाटील, मराठी सिनेअभिनेते युवराज कुमार, मराठी अभिनेत्री केतकी गावडे, साऊ ज्योती संस्थेचे संस्थापक सचिन हाळदे, आयोजक विकास उबाळे, संदीप रमेश शर्मा, विष्णू देशमुख, प्रफुल्ल सरोदे, प्रतापराव जाधव आदींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सतिश वडणगेकर हे गेली ३५ वर्ष मार्शल आर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. अनेक संघटनांवर पदाधिकारी, पंच प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला स्वसंरक्षण कार्यशाळा २५ वर्षेहुन अधिक काळ घेत आले आहेत. तसेच त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सतिश वडणगेकर यांना एबीपी स्पोर्ट्सचे संस्थापक अविनाश पाटील, दिनकर कुंभार, महादेव वडणगेकर, उमेश कुंभार यांचे प्रोत्साहन लाभले.
सतिश वडणगेकर राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कारने सन्मानित
Mumbai
smoke
27
°
C
27
°
27
°
47 %
3.6kmh
0 %
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°

