Homeकला - क्रीडासंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

कोल्हापूर  :
येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल डे बोर्डिंग स्कूल विभागाचा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव उपस्थित होते.
याप्रसंगी आण्णासाहेब जाधव म्हणाले की, खेळाडूंनी खेळामधून तात्पुरता आनंद घेण्यापेक्षा त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे. विविध खेळातील कौशल्ये आत्मसात करावीत. खेळ जीवनात शिस्त, अनुशासन शिकवत असतो. खेळातूनच देशाचे आदर्श नागरिक घडत असतात.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शाळेच्या संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती यांनी, विद्यार्थ्यांनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे असा संदेश आपल्या मनोगतातून दिला.
सर्व विद्यार्थ्यांनी हाऊसनुसार प्रमुख अतिथींना मानवंदना दिली. त्यानंतर क्रीडाज्योतीचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देण्यात आली. अग्नी हाऊस, त्रिशूल हाऊस, आकाश हाऊस व पृथ्वी हाऊस या गटांतर्गत विविध स्पर्धा पार पडल्या.
१०० मी., २०० मी., ४०० मी, ८०० मी. रनिंग, थाळी फेक, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी, रिले, कुस्ती, टेनिस, स्विमिंग, आर्चरी, शुटिंग या वैयक्तिक खेळांसोबतच बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, योगा स्पर्धा, बुद्धिबळ, ज्युडो, कराटे, तायक्वांदो यासारख्या सांघिक खेळांच्या स्पर्धाही पार पडल्या. यावेळी पालकांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ५० मी. रनिंग, रस्सीखेच, कोन रेस यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, डे बोर्डिंग स्कुलचे प्राचार्य अस्कर अली, ज्युनि कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे, सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27 ° C
27 °
27 °
47 %
3.6kmh
0 %
Mon
27 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page