Homeकला - क्रीडायतीराज पाटोळचीे १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघात कुचबिहार स्पर्धेसाठी निवड

यतीराज पाटोळचीे १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघात कुचबिहार स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन  (केडीसीए) चा क्रिकेट खेळाडू यतीराज पाटोळे यांची बीसीसीआय मार्फत घेतली जाणारी १९ वर्षाखालील कुचबिहार तीनदिवसीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यतीराज पाटोळे महाराष्ट्र १९ वर्षाखालील क्रिकेट संघातून खेळणार आहे. ही स्पर्धा साखळी पध्दतीने होईल.
या स्पर्धेतील सामने १६ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर २०२५ पर्यत देशातील वेगवेगळ्या शहरात होणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ ईलाईट ग्रुपमध्ये आहे. या ग्रुपमध्ये महाराष्ट्रबरोबर ओडीसा, उत्तराखंड, हिमाचलप्रदेश, आंध्रप्रदेश व कर्नाटक या सहा राज्य संघाचा समावेश आहे.
पहिला सामना १६ नोव्हेंबर रोजी ओडीसा बरोबर नागाठाणे येथे, दुसरा सामना २३ नोव्हेंबरला उत्तराखंड बरोबर, काशीपूर येथे तिसरा सामना १ डिसेंबर रोजी हिमाचलप्रदेश बरोबर सोलापूर येथे होईल. चौथा सामना ८ डिसेंबरला आंध्रप्रदेश बरोबर पुणे आणि पाचवा सामना १६ डिसेबर रोजी कर्नाटक बरोबर म्हैसछर येथे खेळविण्यात येणार आहे.
यतीराज पाटोळेची यापूर्वी सन २०२२-२३ ला १६ वर्षाखालील महाराष्ट्र संघात व सन २०२२-२३, २०१३-२४ या सलग दोन वर्षी महाराष्ट्र १९ वर्षाखालील संघाच्या कॅम्पसाठी तसेच यावर्षी ऑक्टोंबर २०२५ मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विनु मकंड एकदिवशीय स्पर्धेसाठी देखील निवड झाली होती.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30 ° C
30 °
27.9 °
28 %
4.1kmh
0 %
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page