Homeशैक्षणिक - उद्योग रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आणि ‘अजित कुमार रेसिंग’ यांची भागीदारी

रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स आणि ‘अजित कुमार रेसिंग’ यांची भागीदारी

• कॅम्पा एनर्जी असणार ऑफिशियल एनर्जी पार्टनर
कोल्हापूर :
भारतातील वेगाने प्रगती करणाऱ्या मोटरस्पोर्ट टीम्सपैकी एक, ‘अजित कुमार रेसिंग’ने रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) सोबत भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीअंतर्गत RCPLचा प्रमुख एनर्जी ड्रिंक ब्रँड ‘कॅम्पा एनर्जी’ टीमचा अधिकृत एनर्जी पार्टनर असेल.
रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने सांगितले की, ही भागीदारी भारतीय ग्राहकांना जागतिक दर्जाचे उत्पादने किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याबरोबरच ‘मेक-इन-इंडिया’ उपक्रम आणि भारतीय प्रतिभेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे नेण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आजच्या तरुणांच्या ‘कधीही हार न मानणाऱ्या’ जिद्दीला प्रोत्साहन देत, कॅम्पा एनर्जी टीमला जागतिक रेसिंग सर्किटमध्ये यश मिळवण्यासाठी ऊर्जा पुरवेल.
‘अजित कुमार रेसिंग’ची स्थापना प्रसिद्ध अभिनेते, रेसर आणि पद्म पुरस्कार विजेते अजित कुमार यांनी 2024 मध्ये केली होती. आंतरराष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणारी ही एक व्यावसायिक मोटरस्पोर्ट टीम आहे. आपल्या पहिल्याच वर्षात टीमने 2025 Creventic 24H European Endurance Championship मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत एकूण तिसरे (P3 ओव्हरऑल) स्थान पटकावले होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27 ° C
27 °
27 °
47 %
3.6kmh
0 %
Mon
27 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page