Homeकला - क्रीडावरद उंद्रे आणि नील केळकर उपांत्यपूर्व फेरीत

वरद उंद्रे आणि नील केळकर उपांत्यपूर्व फेरीत

कोल्हापूर :
महाराष्ट्राच्या वरद उंद्रे, नील केळकर, गुजरातच्या कबीर परमार यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला. या विजयासह त्यांनी १६ वर्षांखालील ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. स्पर्धा कोल्हापूर येथील केडीएलटीए टेनिस संकुलात सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०व्या रमेश देसाई मेमोरियल नॅशनल ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या वरद उंद्रे, नील केळकर, गुजरातच्या कबीर परमार यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये उप उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात पुण्याच्या वरद उंद्रे याने आपला शहर सहकारी आठव्या मानांकीत सक्षम भन्साळीचा ५-७, ६-२, ६-० असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. पुण्याच्या नील केळकर येन पश्चिम बंगालच्या अकराव्या मानांकित संकल्प सहानीचा ६-१, ७-५ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गुजरातच्या कबीर परमार याने बाराव्या मानांकित हरियाणाच्या यज मलिकचा ६-४, ६-२ असा तर, पाचव्या मानांकित महाराष्ट्राच्या राघव सरोदेने क्रिशांक जोशीचा ६-३, ६-३ असा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात दहाव्या मानांकित महाराष्ट्राच्या स्वानिका रॉयने श्रावी देवरेचे आव्हान ६-१, ६-१ असे संपुष्टात आणले. अव्वल मानांकित कर्नाटकाच्या स्निग्धा कांताने तेलंगणच्या जोहा कुरेशीचा ६-०, ७-५ असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. आंध्रप्रदेशच्या हर्ष ओरुगंतीने महाराष्ट्राच्या हृतिका कपलेला ४-६, ६-४, ६-१ असे नमविले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27 ° C
27 °
27 °
47 %
3.6kmh
0 %
Mon
27 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page