कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. ज्योती जाधव यांची विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. प्रभारी कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांनी प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ. जाधव यांची नियुक्ती केली.
दरम्यान, प्रभारी प्र-कुलगुरू पदासाठी त्यांच्या नावाची शिफारस गुरूवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेत केली. व्यवस्थापन परिषदेनेही त्यास संमती दिली. प्रभारी कुलगुरू प्रा. गोसावी यांनी गुरुवारी सायंकाळी डॉ. जाधव यांना प्रभारी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती केल्याविषयी पत्र दिले. तसेच, विद्यापीठ प्रशासनाकडून याबाबत कुलपती कार्यालयाला कळविण्यात आले. प्रा. डॉ.ज्योती जाधव यांनी गुरुवारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
डॉ. जाधव ह्या जागतिक आघाडीच्या शास्त्रज्ञांमध्ये समाविष्ट असलेल्या ज्येष्ठ संशोधक आहेत. त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले आहे. शिवाजी विद्यापीठात नियमित प्र-कुलगुरू नियुक्त होईपर्यंत त्यांचा प्रभारी प्र-कुलगुरूपदाचा कार्यकाल राहणार आहे.
दरम्यान, सायंकाळी प्रभारी कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. ज्योती जाधव यांचे अभिनंदन व स्वागत केले.
——————————————————-
शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरूपदी डॉ. ज्योती जाधव
RELATED ARTICLES
Mumbai
haze
28
°
C
28
°
28
°
83 %
2.6kmh
40 %
Mon
28
°
Tue
27
°
Wed
26
°
Thu
27
°
Fri
29
°

