Homeशैक्षणिक - उद्योग फुलेवाडीत सुरू होतंय 'बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंट'

फुलेवाडीत सुरू होतंय ‘बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंट’

• आज ‘बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंट’च्या दुसऱ्या शाखेचे उदघाटन
कोल्हापूर :
गेल्या १५ वर्षांपासून लोकांना सेवा देत असलेले दसरा चौक येथील बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंट आता फुलेवाडीत सुरू होत आहे. आपल्या चटकदार व्हेज डिशेस आणि थाळीच्या माध्यमातून लोकांना सेवा देत आलेल्या बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंटने १५ वर्ष पूर्ण केली आहेत. या रेस्टॉरंटची दुसरी शाखा फुलेवाडी मेन रोडवर दत्त मंदिर येथे सुरू होत असल्याची माहिती महेश पोवार, विश्वास कळके यांनी दिली. यावेळी सौ. अनुजा मेहेंदळे, धर्मेश मेहेंदळे, सौ. दिपाली पोवार आदी उपस्थित होते.
ते म्हणाले की, बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंटची दुसरी शाखा ही फुलेवाडी दत्त मंदिर येथे सुरू होत आहे. गुरूवारी (दि.३०) के. एम. पी. हॉटेलिअर्सचे शुध्द शाकाहारी “बांसुरी फाईन डाईन” हे नूतन भव्य रेस्टॉरंट सुरू होत आहे. या रेस्टॉरंटचे उदघाटन खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी हॉटेल मालक संघ अध्यक्ष सचिन शानभाग, उपाध्यक्ष सिध्दार्थ लाटकर, उज्वल नागेशकर, आनंद माने, चेंबर ऑफ कॉमर्स, क्रिडाई अध्यक्ष के. पी. खोत आणि भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव यांची उपस्थिती आहे.
या रेस्टॉरंटच्या चवदार जेवणाची मेजवानी आता कोल्हापूरकरांना दुसऱ्या शाखेच्या माध्यमातून रंकाळा, फुलेवाडी सोबतच आजूबाजूच्या ठिकाणच्या ग्राहकांना वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची चव अनुभवायला आणि चाखायला मिळणार आहे. याठिकाणी व्हेजमध्ये पंजाबी, महाराष्ट्रीयन थाळी, तंदूर, चायनीज, कॉन्टिनेन्टल, डेझर्टस अशा पद्धतीचे जेवण ग्राहकांना मिळणार आहे. अत्यंत माफक दरात कोल्हापूरकरांना आणि बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना एसी व ओपन गार्डनमध्येही कुटुंबासहीत जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांना व वाढदिवस आणि ऑफिशियल कॉन्फरन्ससाठी एसी हॉलची सुविधा रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध आहे.
या रेस्टॉरंटमध्ये ए.सी, ओपन गार्डनची सोय, एसी बँक्वेट हॉल, चेंजिग रूम/फीडिंग रूम आदी सुविधा उपलब्ध आहेत. सर्वांना परवडेल असे हे रेस्टॉरंट ३१ ऑक्टोबरपासून ग्राहकांसाठी खुले होणार आहे. कोल्हापूरकरांनी बांसुरी प्युअर व्हेज रेस्टॉरंटच्या दुसऱ्या शाखेला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन या रेस्टॉरंटच्या टीमने केले आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
33 ° C
33 °
33 °
40 %
6.7kmh
0 %
Sat
33 °
Sun
30 °
Mon
31 °
Tue
29 °
Wed
29 °

Most Popular

You cannot copy content of this page