कोल्हापूर :
वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टची खेळाडू जानवी राहूल लोढा हिने ५६ किलोखालील वजन गटात ९ ते १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत सुवर्णपदकाचा बहुमान मिळवला. तिची श्रीनगर जम्मू काश्मीर येथे राष्ट्रीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जानवी लोढा ही नरकेज् पन्हाळा पब्लिक स्कूल पन्हाळामध्ये इयत्ता ९वीमध्ये शिकत आहे. तिला महाराष्ट्र वुशू संघटनेचे सचिव सोपान कटके, वुशू कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष राजगौंडा वळीवडे, उपाध्यक्ष सतीश वडणगेकर, सचिव
सुभाष पासान्ना यांचे प्रोत्साहन तर अविनाश पाटील, अमर मिरजे यांचे मार्गदर्शन लाभले.
शालेय राष्ट्रीय वुशू स्पर्धेसाठी जानवी लोढा हिची निवड
RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
28.4
°
C
28.4
°
28.4
°
55 %
4.5kmh
1 %
Tue
28
°
Wed
30
°
Thu
30
°
Fri
29
°
Sat
28
°

